Premium

“मी सध्या…” दोन घटस्फोट झालेली स्नेहा वाघ डेटवर, फोटो केला शेअर

तिने स्वत: पोस्ट करत याबद्दलचा खुलासा केला आहे.

sneha wagh
स्नेहा वाघ

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्नेहा वाघला ओळखले जाते. ती बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. स्नेहा वाघ ही कायमच चर्चेत असते. स्नेहा वाघ ही सध्या डेटवर गेली आहे. तिने स्वत: पोस्ट करत याबद्दलचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्नेहा वाघ ही कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या लव्हलाईफची आणि वैवाहिक आयुष्याची कायमच चर्चा होताना दिसते. नुकतंच स्नेहाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने उटीला फिरतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : दोन घटस्फोट झालेल्या स्नेहा वाघचे प्रेम आणि रिलेशनशिपबद्दल वक्तव्य, म्हणाली “त्या माणसाशी…”

या फोटोत ती छान निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणाली, “मी सध्या व्यस्त आहे. कारण मी डेटवर आली आहे. ते देखील स्वत: बरोबर. सध्या शांती आणि आनंदाच्या शोधात आहे.” तिने या फोटोला विविध हॅशटॅगही दिले आहेत.

तिच्या या फोटोमध्ये ती छान रमल्याचे दिसत आहे. स्नेहाच्या या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी यावर कमेंट करत फार छान, मस्त, खूप सुंदर असे म्हटले आहे.

आणखी वाचा : “माझा प्रेमावर…” ब्रेकअपनंतर प्राजक्ता माळीने पहिल्यांदा केले प्रेमाबद्दल भाष्य 

दरम्यान स्नेहा वाघने अगदी कमी वयात म्हणजेच अवघ्या १९ वर्षांची असताना स्नेहाने अविष्कार दार्व्हेकरबरोबर लग्नगाठ बांधली. मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले. स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी स्नेहाने दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्नेहाने इंटेरियर डिझायन असलेल्या अनुराग सोलंकीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. पण तिचे हे दुसरे लग्नही जवळपास आठ महिनेच टिकलं. त्यानंतर स्नेहा दुसऱ्या पतीपासून देखील विभक्त झाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss marathi actress sneha wagh enjoying vacation share photos said on a date nrp

First published on: 18-03-2023 at 15:31 IST
Next Story
“नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो” प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला “माझ्या पत्नीने…”