Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच भाऊचा धक्का पार पडला. यावेळी रितेश देशमुखने पहिल्यांदाच घरात एन्ट्री घेतली होती. रितेशच्या येण्याने सर्व सदस्य खूपच आनंदी झाले होते. घरात आल्यावर अभिनेत्याने या सगळ्या सदस्यांना एक गोड सरप्राइज दिलं.
रितेशने भाऊच्या धक्क्यावर सर्व सदस्यांना त्यांच्या घरातल्या मंडळींनी पाठवलेले व्हिडीओ मेसेज दाखवले. अंकिताचे आई-वडील, पंढरीनाथची लेक, अभिजीतच्या दोन मुली, निक्कीची आई, जान्हवीचा मुलगा, डीपीचे वडील या सगळ्या कुटुंबीयांनी खास शुभेच्छा देणारे व्हिडीओ तयार करून पाठवले होते. हे व्हिडीओ पाहून सगळ्याच सदस्यांना अश्रू अनावर झाले होते.
कुटुंबीयांचे व्हिडीओ मेसेज पाहिल्यावर सगळे सदस्य खूप भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी हा भाग पाहणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा अश्रू अनावर झाले होते. याबद्दल ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकरने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
अक्षय केळकरची पोस्ट
डिअर बिग बॉस मराठी ५,
आतापर्यंत मी कोणत्याच सदस्याबद्दल सोशल मीडियावर बोललो नाही आणि आताही सदस्यांबद्दल बोलत नाहीये.
कारण मला माहीत आहे… ते घर, आतली परिस्थिती, खेळाडूंची मानसिक स्थिती, EMOTIONS चा चढ उतार, योग्य-अयोग्यचा विळखा, निर्णय – संयमाची रोजची परीक्षा, रोज बदलणारी गणित, टिकण्याची चुरस, मनाची – बुद्धीची आणि शरीराची TO THE BEST कसोटी.
आणि ह्या सगळ्यात – तुमचं आवडत जेवण आणि तुमच्या आवडीची माणसं मात्र घराबाहेर… फक्त एवढंच माहीत असतं की, ते बाहेरून मला बघत आहेत… आणि त्या आशेवर रोज स्वतःला तयार करायचं नवीन आव्हान झेलायला. इथे कोणीच वाईट नसतो…
बिग बॉस, कालचा एपिसोड खूपच जास्त HEART TOUCHING होता. AFTER ALL THET HAPPENED IN THIS WEEK, प्रत्येक सदस्याला त्याच्या जवळच्या माणसांना बघणं गरजेचं होतं… आणि त्या EMOTIONS खरंच त्यांच्या मनातून आमच्या मनापर्यंत पोहोचल्या.
कमाल
हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकरमध्ये बिनसलं, डीपी नाराजी व्यक्त करत म्हणाला, “आता बास झालं…”
दरम्यान, अक्षयने त्याने लिहिलेल्या पोस्टमध्ये घरातील सगळ्या सदस्यांना टॅग देखील केलं आहे. त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, २०२२ मध्ये त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचं विजेतेपद पटकावलं. सध्या तो ‘कलर्स वाहिनी’च्या ‘अबीर गुलाल’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत.