Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन संपला असला तरीही, यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची लोकप्रियता आजही कायम आहे. काही दिवसांपूर्वीच दिवाळीच्या निमित्ताने विजेत्या सूरजच्या मोढवे गावी इरिना, वैभव, धनंजय, जान्हवी किल्लेकर असे सगळे सदस्य गेले होते. यादरम्यान अंकिता वालावलकर आपल्या मानलेल्या भावाची भेट घ्यायला केव्हा जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. अखेर ती भेट आज झाली.

अंकिता वालावलकर कामानिमित्त आणि तिच्या आई-बाबांना भेटण्यासाठी खास कोकणात गेली होती. यावेळी तिने कोकणाहून परतताना धनंजय पोवारच्या घरी भेट दिली होती. आता अंकिता सूरजला भेटण्यासाठी त्याच्या मोढवे गावी पोहोचली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सूरज नेहमी सगळ्यांना “मला माझ्या गावच्या चटणी भाकरीची आठवण येते” असं सांगायचा. तेव्हाच त्याने माझ्या गावी आल्यावर आपण भाकरी आणि चटणी खाऊया असं सर्वांना सांगितलं होतं. अंकिता गावी गेल्यावर या सगळ्यांनी खास रानात बसून भाकरी अन् चटणीवर ताव मारला आहे.

bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?
bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Suraj Chavan And Jahnavi Killekar
‘बिग बॉस’नंतर सूरजमध्ये काय बदल झाला? जान्हवी किल्लेकर म्हणाली, “तो आता जास्त…”

हेही वाचा : Video : तारीख अन् वेळ ठरली! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार…; प्राजक्ता माळीने शेअर केली सेटवरच्या शूटिंगची झलक

अंकिता तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या सोबतीने सूरजच्या मोढवे गावी पोहोचली होती. यावेळी सूरजच्या गावात या ‘कोकण हार्टेड गर्ल’चं मोठ्या प्रेमाने स्वागत करण्यात आलं. अंकिता व कुणाल यांचा साधेपणा प्रत्येकाला भावला. या दोघांनी सूरजच्या गावच्या शेतात बसून त्याच्याशी गप्पा मारल्या. याचा व्हिडीओ ‘गुलीगत किंग’ने युट्यूबला शेअर केला आहे.

अंकितासाठी सूरजच्या बहि‍णीने भाकरी अन् चटणीचा बेत केला होता. या तिघांनी शेतात एकत्र बसून या जेवणावर ताव मारला. सूरजच्या गावाचं, त्याने केलेल्या स्वागताचं अंकिताने कौतुक देखील केलं. ‘कोकण हार्टेड गर्ल’ने यावेळी सूरजच्या बहिणीला चटणी कशी केली याची रेसिपी देखील विचारली. यावेळी ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात कधीकधी फक्त एकवेळचं जेवण मिळालं या आठवणी सुद्धा सूरज-अंकिताने सर्वांना सांगितल्या.

हेही वाचा : आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”

दरम्यान, अंकिताने ( Bigg Boss Marathi ) मुंबईहून येताना सूरज व त्याच्या घरच्यांना खाऊ देखील आणला होता. अंकिताच्या नवऱ्याने बनवलेल्या गाण्यांचं यावेळी सर्वांनी कौतुक देखील केलं. जेवण झाल्यावर अंकिताने सर्वांची भेट घेऊन मोढवे गावातून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केलं.

Story img Loader