bigg boss marathi apurva nemlekar vikas sawant kiran mane sami sami dance video viral | Loksatta

Video: लुंगी नेसून किरण मानेंचा अपूर्वा व विकाससह ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss Marathi: ‘सामी सामी’ गाण्यावर थिरकले अपूर्वा, विकास व किरण माने; राखी सावतंने दिली भन्नाट प्रतिक्रिया

Video: लुंगी नेसून किरण मानेंचा अपूर्वा व विकाससह ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत व किरण माने यांनी 'सामी सामी' गाण्यावर डान्स केला. (फोटो: कलर्स मराठी)

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. यंदाच्या आठवड्यात घरात ‘बिग बॉस’चा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. ‘बिग बॉस’च्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन घरात करण्यात येणार आहे.

‘बिग बॉस’च्या वाढदिवसानिमित्त घरातील सदस्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत व किरण माने यांनी ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स केला. रश्मिका मंदानाची गाण्यातील हुक स्टेपही त्यांनी केली. ‘कलर्स मराठी’च्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> Video: हळदी कार्यक्रमात बेभान होऊन नाचले राणादा-पाठकबाई, मित्रांनी उचलून घेतलं अन्…; अक्षया-हार्दिकचा डान्स व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> अमिताभ बच्चन यांनी फेडलं होतं ९० कोटींचं कर्ज; परेश रावल ‘त्या’ प्रसंगाची आठवण करत म्हणाले…

‘सामी सामी’ गाण्यावर डान्स करण्यासाठी अपूर्वा,विकास व किरण माने यांनी खास दाक्षिणात्य पेहराव केला होता. लुंगी नेसून किरण मानेंनी या डान्सला चार चांद लावले. त्यांचा हा डान्स घरातील इतर सदस्यांसह राखी सावंतच्याही पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. अपूर्वा, विकास व किरण मानेंचा हा डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही पाहा>> Photos: पुण्याच्या Golden Guysचा नादखुळा! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी अन्…; ‘गोल्डन कार’ कलेक्शन पाहिलंत का?

‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड कार्डद्वारे राखी सावंत, विशाल निकम, मीरा जगन्नाथ व आरोह वेलणकर या चार सदस्यांनी एन्ट्री घेतली आहे. तर हाताला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तेजस्विनी लोणारीला खेळ अर्ध्यावरच सोडून बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 20:21 IST
Next Story
Video : बँड बाजा, सजावट, पाहुण्यांची गर्दी; हळदी कार्यक्रमासाठी राणादा-पाठकबाईंनी केला मनसोक्त खर्च, हा व्हिडीओ एकदा पाहाच