Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात पहिल्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या सदस्यांमध्ये वाद होताना दिसत आहेत. निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये पडलेली वादाची ठिणगी बंद होण्याच नाव घेत नाहीये. तसंच दुसऱ्या बाजूला देखील निक्की तांबोळीचे वाद इतर सदस्यांबरोबर देखील होताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता नॉमिनेशवरून 'बिग बॉस' घरातील सदस्यांमधील वाद आणखी पेटला आहे. नॉमिनेशवरून नायिका वर्सेस खलनायिका असं चित्र निर्माण झालं आहे. म्हणजेच योगिता चव्हाण आणि जान्हणी किल्लेकरमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या ( Bigg Boss Marathi ) घरात आज पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. नॉमिनेशन टास्क नेमका कसा असेल? यात कोण सेफ आणि कोण नॉमिनेट होणार याकडे 'बिग बॉस' प्रेमींचं लक्ष लागलं आहे. याच वेळी नॉमिनेशवरून योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळणार आहे. पहिल्या टास्कदरम्यान 'बिग बॉस'ने ज्यांच्याकडे स्वत:ची स्टॅटर्जी नाही…दुसऱ्यांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात अशा सदस्यांना नॉमिनेट करण्यास सांगितलं आहे. यामुळे योगिता आणि जान्हवीत वाद रंगला आहे. कारण योगिताने जान्हवीला नॉमिनेट केल्याचं पाहायला मिळणार आहे. हेही वाचा - घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसली ऐश्वर्या राय-बच्चन, प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबरचा फोटो व्हायरल Bigg Boss Marathi योगिता आणि जान्हवीमधील बाचाबाची पाहा नॉमिनेशनवरुन जान्हवी म्हणते, "योगिताने मुर्खासारखं कारण न देता नॉमिनेट केलं आहे". त्यावर योगिता म्हणते, "जान्हवी मी तुला मुर्खासारखा हा शब्द वापरलेला नाही. तू तोंडावर वेगळी आहेस आणि मागे वेगळी वागतेस". यावर जान्हवी म्हणते, "पण मला योग्य कारण तर दे". त्यानंतर योगिता म्हणते, "बिग बॉस'नं सांगितल्यानुसारच मी नॉमिनेट केलं आहे." View this post on Instagram A post shared by Colors Marathi (@colorsmarathi) हेही वाचा – Bigg Boss Marathi : “अत्यंत लज्जास्पद…”, निक्कीने वर्षा उसगांवकरांचा अपमान केल्यामुळे मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “रितेश देशमुख…” दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वाला दमदार सुरुवात झाली आहे. पण आता हे पर्व पहिल्या आठवड्याच्या शेवटाकडे आलं आहे. त्यामुळे नॉमिनेशन टास्क 'बिग बॉस'ने सदस्यांना दिला आहे. या टास्कमध्ये कोण कोणाला नॉमिनेट करत आणि पहिल्याच आठवड्यात कोण घराबाहेर जात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.