scorecardresearch

“तुम्ही एक तासाचा भाग बघताय आणि…” बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या रुचिरा जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या रुचिरा जाधवने विशाल निकमला पाठिंबा दिला आहे.

“तुम्ही एक तासाचा भाग बघताय आणि…” बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या रुचिरा जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत
रुचिरा जाधव

छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व रंजक दिवसेंदिवस होत चाललं आहे. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसने सदस्यांना आश्चर्याचे धक्के द्यायला सुरुवात केली आहे. आता ‘बिग बॉस’ने संपूर्ण महाराष्ट्राच्या तमाम जनतेला एक मोठे सरप्राईज दिले. बिग बॉसच्या घरात चार नवीन सदस्यांची घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. बिग बॉसच्या घरात विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ आणि राखी सावंत हे चार जण सहभागी झाले आहेत. त्यातच आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या रुचिरा जाधवने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने विशाल निकमला पाठिंबा दिला आहे.

बिग बॉसच्या यंदाच्या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे हे रिअल लाईफ कपल सहभागी झाले होते. मात्र बिग बॉस मराठीच्या घरात रोहित आणि रुचिराचे मतभेद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर रुचिराला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. यानंतर आता रुचिराने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने विशाल निकमचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात विशाल हा तुळशीला नमस्कार करताना दिसत आहे. याबरोबर तिने याला कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा- “मला लाखो रुपये दिले तरीही…” रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रुचिरा जाधव स्पष्टच बोलली

रुचिरा जाधवची इन्स्टाग्राम पोस्ट

“तुळशी मायेला खूप मिस करत होते मी… हे दृश्य पाहून छान वाटलं. माझं दररोज सकाळी हे काम असायचं. मला माहित होतं, एक वेळ अशी येईल, जेव्हा त्या घरात मी माझं म्हणावं असं कोणीही नसेल, तेव्हा फक्त ही तुळशी माय असेल (ती वेळ जरा अवेळीच आली.)

रोज सकाळी तिच्यापाशी जाऊन माझं हितगुज सांगून छान वाटायचं. या घराने जशा कडू आठवणी दिल्या, तशा गोड आठवणी सुद्धा दिल्या. तुम्ही एक तासाचा एडिट केलेला भाग बघितलाय. मी २४ तास सातही दिवस बागडलेय त्या घरात. माझ्या पद्धतीने गेम खेळलेय. प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न केलाय.

मी एखाद्या गोष्टीशी फार लगेच जोडली जाते. मी कायमच काम आणि माझे कुटुंब याला प्राधान्य दिले आहे. ते माझं काम होतं. मी नेहमीच माझ्या हृदयाचे आणि मनाचे ऐकत आली आहे. त्या रंगेबेरंगी घराशी, वास्तूशी प्रचंड जोडली गेले होते मी… असो”, असे तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘तू माझा क्रश आहेस’ म्हणणाऱ्या चाहतीला सोहम बांदेकरचे हटके स्टाईल उत्तर, म्हणाला “हेच मला…”

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. या मालिकेत तिने माया ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. रुचिरा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या ती बिग बॉस स्पर्धेतून बाहेर पडली असल्याने सातत्याने पोस्ट शेअर करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 17:57 IST

संबंधित बातम्या