Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातली मैत्रीची समीकरणं दिवसेंदिवस बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. घरात पहिल्या दिवसापासून एकत्र असणारी ‘टीम ए’ कालांतराने फुटल्याचं काही आठवड्यांपूर्वी प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. जान्हवी-निक्की या मैत्रिणी आता पक्क्या वैरी झाल्या आहेत. तर, घन:श्याम, वैभव या सदस्यांनी घराचा निरोप घेतला आहे. आता हीच परिस्थिती ‘B टीम’मध्ये देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

स्पर्धेचा आठवा आठवडा सुरू होताच आता डीपीने आपला संपूर्ण गेम बदलला आहे. सोमवारच्या भागात धनंजय अंकितासमोर “आता मी माझा खेळणार…तुला अडचणीत गरज लागली तरच मदत करेन” असं म्हणाला होता. आता आजच्या भागात सुद्धा इथून पुढे एकट्याने खेळायचं हाच माझा गेमप्लॅन असेल असं ठाम मत डीपीने निक्कीसमोर मांडलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “गुहेत पळून जाणारा सिंह…” म्हणत अभिजीतने उडवली अरबाजची खिल्ली; घराबाहेर जाण्याविषयी केलं भाकित

धनंजयची गेमसाठी नवीन Strategy

धनंजय निक्कीला सांगतो, “मी कोणत्याही टीमचा पार्ट नाहीये. अभिजीत आणि अंकितामुळे मी सावली बनून राहणार नाही. मला जर दिसायचं असेल, तर मी त्यांच्यात खेळू शकत नाही. त्यामुळे मी माझी Strategy बदललीये”

धनंजयने घेतलेल्या निर्णयावर मात्र, अभिजीत, पॅडी यांनी नाराजी व्यक्त करत आता एकट्याने खेळण्याची परिस्थिती नाही असं मत मांडलं आहे. तर, डीपीने आता गेम बदलल्यामुळे नेटकऱ्यांच्या त्याच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘जंगलराज’मध्ये घरातील ५ सदस्य झाले नॉमिनेट! जान्हवीला अश्रू अनावर, तर निक्कीने…; नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi : बी टीममध्ये पडली फूट ( फोटो सौजन्य : कसर्स मराठी वाहिनी )

“हे अंकिताने आधी चालू केलंय त्यामुळे डीपीसाठी व्होट करा”, “यालाच म्हणतात कोल्हापुरी पॅटर्न”, “डीपी भाऊ तुम्ही छान खेळता…तुम्हाला हवं तसं खेळा” असं मत काही नेटकऱ्यांनी मांडत धनंजयला पाठिंबा दर्शवला आहे. तर, अन्य काही युजर्सनी हा चुकीचा निर्णय असल्याचं कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, धनंजयने बदललेल्या गेम प्लॅनचा त्याला फायदा होणार की तोटा हे आता येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. तसेच रितेश या नव्या गेमप्लॅनबद्दल डीपीला भाऊच्या धक्क्यावर काय सल्ला देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.