‘बिग बॉस मराठी ५’फेम गायक अभिजीत सावंत हा त्याच्या नवीन गाण्यामुळे मोठ्या चर्चेत आला आहे. तो दिवाळीनिमित्त भावा-बहिणीच्या नात्यावर आधारित एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. सारेगम मराठीने अभिजीत सावंतचे गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे.

भावा-बहिणीच्या नात्यावर अभिजीत सावंतचे मंत्रमुग्ध करणारे गाणे

भावा-बहिणीच्या नात्यावर आधारित हे गाणे असून याचे ‘लाडकी बहीण’ असे नाव आहे. हे गाणे सोशल मीडियावर शेअर करत सारेगम मराठीने, “सगळ्या भाऊ- बहिणींसाठी घेऊन आलोय एक नवीन गाणं, ‘लाडकी बहीण’ आपल्या लाडक्या अभिजीत सावंतला खूप प्रेम द्या”, असे कॅप्शन दिले आहे.

Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
suraj chavan new reel comments
सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Bigg Boss Marathi Fame Abhijeet Sawant and her wife met yogita Chavan Nikhil damle
‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणच्या घरी पोहोचला अभिजीत सावंत, पत्नी शिल्पा सावंत फोटो शेअर करत म्हणाली…
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel video call
निक्की तांबोळीने केला सूरज चव्हाणला Video कॉल! सोबतीला होता अरबाज; म्हणाली, “भावा लवकरच…”
अभिजीत सावंत इन्स्टाग्राम

चाहत्यांना हे गाणं आवडत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिजीत सावंतने विविध पोस्टच्या माध्यमातून भावा-बहिणीच्या नात्यावर असे गाणे येणार असल्याचे सांगितले होते. आता ‘बिग बॉस मराठी ५’नंतर अभिजीत या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता प्रेक्षकांना ते आवडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अभिजीत सावंतने शेअर केलेल्या या व्हिडीओवर जान्हवी किल्लेकर, पुरुषोत्तम दादा पाटील यांनी कमेंट करत अभिजीतचे कौतुक केले आहे. पुरुषोत्तम दादा पाटील यांनी लिहिले, “एकदम भारी अभिजित दादा, ह्या भाऊबीजेला लाडक्या बहिणीचं यथार्थ वर्णन”. चाहत्यांनीदेखील अभिजीतच्या गाण्याचे आणि त्याच्या आवाजाचे कौतुक केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी “खूप छान दादा”, “एकदम भारी गायलास तू”, अशा कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: ‘बॉबी’ सिनेमासाठी ‘या’ अभिनेत्याने तयार केला होता डिंपल कपाडिया यांचा लूक; खुलासा करत म्हणाल्या, “मला खूप त्रास…”

दरम्यान, अभिजीत सावंत हा त्याच्या अनेक लोकप्रिय गाण्यांसाठी ओळखला जातो. इंडियन आयडॉल सीझन पहिला या पर्वात सहभागी होत त्याने ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर काही गाण्यांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये अभिजीत सावंत सहभागी झाला होता. या शोमध्ये त्याने आपल्या वागण्याने आणि खेळाने प्रेक्षकांचे मन जिंकले. मात्र त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. आता अभिजीत आणखी कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader