Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या सातवा आठवडा सुरू आहे. या पर्वात एकूण १६ सदस्य सहभागी झाले होते. आतापर्यंत पाच सदस्य घराबाहेर झाले आहेत. पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना, आणि घन:श्याम दरवडे यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. त्यामुळे आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात १२ सदस्य आहेत. अशातच बेघर झालेल्या इरिनाचा सध्या एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील तिचा डान्स पाहून नेटकरी कौतुक करत आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील चौथ्या आठवड्यात इरिना घराबाहेर झाली. पण घराबाहेर झाल्यानंतरही इरिना तितकीच चर्चेत असते. नुकतंच तिने पुण्यातील मानाचा गणपती आणि भारतातील पहिला सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाचं म्हणजेच भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी तिच्या हस्ते बाप्पाची आरती झाली. एवढंच नव्हे तर यावेळी इरिना बेभान डान्स करताना दिसली. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तिचं कौतुक होतं आहे.

aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
bigg boss marathi aarya slaps nikki surekha kudachi reaction
“अरबाज बोंबलत सुटला थप्पड मारली…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी सुरेखा कुडचींचा सवाल, म्हणाल्या…
namrata sambherao dance on kolhapuri halgi with husband
कोल्हापुरी हलगीवर नम्रता संभेरावने पतीसह धरला ठेका! नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आपली संस्कृती…”
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”

हेही वाचा – “आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी”, अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “बाबा…”

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “बाहेरच्या देशातून येऊनही आपली संस्कृती जपतेय. खूप छान.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “खरंतर इरिना महाराष्ट्रात जन्माला यायला पाहिजे होती. चुकून रशियात गेली.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, अंगभर कपडे. ही आपली संस्कृती आहे. व्वा इरिना छान वाटलं. चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “व्वा इरिना मस्त. बाहेरची असूनही महाराष्ट्राची संस्कृती जपतेस.” पाचव्या नेटकऱ्याने लिहिलं की, बाहेरच्या देशातील असूनही भारतीय संस्कृती तू जपतेस खरंच तुला मानलं…एकदम मस्त.

Comments On Irina Dance Video
Comments On Irina Dance Video

हेही वाचा – “अभी तो खेल शुरु हुआ हैं…” म्हणत विशाखा सुभेदारने पंढरीनाथ कांबळेचं केलं कौतुक, म्हणाली, “अंदाजे तुझं वय वर्षे ५२ असावं, पण…”

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर इरिना काय म्हणाली?

दरम्यान, एलिमिनेट झाल्यानंतर इरिना सर्व सदस्यांना जाताना म्हणाली होती की, तुमच्यासाठी काहीपण…मी हा खेळ खेळण्यासाठी माझे १०० टक्के दिले. जर मी कोणाला दुखावलं असेल तर, प्लीज मला माफ करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नेहमी तुम्ही सगळे आहात तसेच वागा. सगळ्यांना ट्रॉफी हवीये… सगळ्यांना गेम खेळायचाय पण, तुम्ही जसे आहात तसेच राहा. त्यानंतर तिने स्वतःच्या म्युच्युअल फंडचा वारसदार वैभवला करत त्याच्या खात्यात ५० पॉईंट्स जमा केले.