Premium

Video: लिफ्ट बंद होत असताना दरवाजामध्ये पाय टाकून बाहेर पडली मराठी अभिनेत्री; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “येडे चाळे करायची…”

मराठी अभिनेत्रीचा ‘हा’ व्हिडीओ झालाय तुफान व्हायरल

bigg boss marathi fame sonali patil new video viral pps 98
मराठी अभिनेत्रीचा 'हा' व्हिडीओ झालाय तुफान व्हायरल

कलाकार जितके त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात, तितकेच ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. त्यांचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या अभिनेत्री सोनाली पाटीलच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री सोनाली पाटीलने हा व्हिडीओ काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनाली लिफ्ट बंद होत असताना दरवाजामध्ये पाय टाकून बाहेर पडताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी तिला सुनावलं आहे.

हेही वाचा – Video: “…एकदा येऊन तर बघा”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित मानेच्या बायकोने घेतला खास उखाणा; व्हिडीओ झाला व्हायरल

सोनालीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मेट्रोमध्ये करा असा स्टंट.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “दार उघडलं होतं तेव्हा काय झालं बाहेर यायला.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “प्रेक्षकांसाठी चुकीचा संदेश आहे.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तू खतरों के खिलाडीमध्ये जा म्हणजे कळेल स्टंट कसा करावा..” तर पाचव्या नेटकऱ्याने लिहिलं, “हे असे येडे चाळे करायची वेगळी ट्रेनिंग असते का?”

हेही वाचा – तेजश्री प्रधान ‘या’ दोन गोष्टींमुळे ओरडत असते राज हंचनाळेला, म्हणाली, “मी…”

दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘बिग बॉस मराठी’ पूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘वैजू नंबर वन’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर ती ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ यांसारख्या मालिकामध्ये झळकली होती. एवढंच नाहीतर सोनालीनं हिंदी मालिकेतही काम केलं. ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेत ती दिसली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss marathi fame sonali patil new video viral pps

First published on: 10-12-2023 at 15:55 IST
Next Story
“मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात होते”, मराठमोळ्या अभिनेत्रीचे वक्तव्य; म्हणाली, “जेव्हा त्याने वेगळं होण्याचा निर्णय…”