‘बिग बॉस मराठी ५’ व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असलेला दिसतो. मुलाखतींमध्ये केलेली वक्तव्ये, सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. आता सूरज चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओचे कौतुक होताना दिसत आहे.

डोक्यावरून हात फिरवत सूरज चव्हाणने रूद्राप्रति ‘अशी’ केली कृतज्ञता व्यक्त

सूरज चव्हाणने शेअर केलेल्या या व्हिडीओच्या सुरुवातीला, सूरज बैलाच्या गळ्यात हार घालत आहे. तो त्याच्या पाया पडतो. याच व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की, सूरज बैलाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आहे. एक प्रकारे तो कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘रूद्रा’ असे कॅप्शन दिले असून सुरेश वाडकर यांचे ‘बा विठ्ठला धाव पावरे’ हे गाणे बॅकग्राऊंडला लावले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
Suraj Chavan And Jahnavi Killekar
‘बिग बॉस’नंतर सूरजमध्ये काय बदल झाला? जान्हवी किल्लेकर म्हणाली, “तो आता जास्त…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?
bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
bigg boss marathi dhananjay irina vaibhav and jahnavi visit suraj chavan hometown
दिवाळीनिमित्त सूरजच्या गावी पोहोचले Bigg Boss Marathi 5 मधले ‘हे’ सदस्य! फोटो आला समोर, नेटकरी म्हणाले, “तुमची दोस्ती…”

सूरज चव्हाणने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. “प्रत्येक शेतकऱ्याचा मालक आपला बैल”, “तुझा साधेपणा”, “अभिमान आहे सूरज दादा”, “ऐसा सूरज पुन्हा होणे शक्य नाही”, “एक नंबर”, अशा प्रकारच्या कमेंट करत नेटकऱ्यांनी सूरजचे कौतुक केले आहे.

इन्स्टाग्राम

सूरज चव्हाण हा सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. त्याच्या विनोदी आणि हटके कंटेंटसाठी त्याची ओळख आहे. अनेकदा त्याला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. मात्र, तरीही न थांबता त्याने त्याचे काम सुरू ठेवले. सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग असलेल्या सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याला बिग बॉसमध्ये पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. मात्र, सूरजने आपल्या स्वभावाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मन जिंकले आणि तो या पर्वाचा विजेता झाला. सूरज चव्हाणची घरची परिस्थिती गरिबीची असून त्याच्या आई-वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले आहे. या सगळ्यावर मात करत सूरजने त्याची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या तो सतत चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा: “जर तुम्ही सलमान खानला चॅलेंज दिले तर तुमचे करिअर…”, ‘बिग बॉस १८’फेम व्हायरल भाभीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “पण मी असा इतिहास…”

दरम्यान, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसनंतर सूरजला चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader