गायक, अभिनेता उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याची प्रत्येक पोस्ट ही लक्ष वेधून घेणारी असते. काही दिवसांपूर्वीचं त्यानं आजोबा प्रल्हाद शिंदेंचा दुर्मिळ व्हिडीओ शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. उत्कर्षची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. आता उत्कर्षने पर्यावरणाविषयी एक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे. हेही वाचा - Video: गणपती बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवतात? लिटिल चॅम्प्सनं दिलेलं उत्तर ऐकून मृण्मयी देशपांडे झाली थक्क सध्या सर्वत्र गणेशोत्सवामुळे उत्साहचं वातावरण आहे. पण गणेशोत्सव झाल्यानंतर म्हणजेच लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर समुद्र किनारे अस्वच्छ पाहायला मिळतात. काही गणपतीच्या मुर्ती वाईट अवस्थेत समुद्र किनारी आलेल्या असतात. तर हार, फुलं असं सर्व काही किनाऱ्यापाशी साचलेलं दिसतं. अशा वेळी प्रशासनाबरोबर अनेक संघटना समुद्र किनारे साफ करण्याचं काम करतात. काल अशाच एका संघटनेत उत्कर्षनं सहभाग घेतला. याचे फोटो शेअर करत त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे. हेही वाचा- Rahul Vaidya And Disha Parmar: लक्ष्मी आली घरी! राहुल वैद्यच्या आई-वडिलांनी नातीचं केलं असं स्वागत; पाहा व्हिडीओ उत्कर्षनं फोटो शेअर करत लिहीलं आहे की, "महाराष्ट्र आपला, उत्सव आपला, बाप्पा आपले, तर जबाबदारीही आपलीच. आपल्या सर्वांचा आवडीचा गणेशोत्सव सुरू आहे. ५ दिवसांच्या गौरी गणेशाचे विसर्जन ही झाले आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी अनेक समुद्र किनारपट्टीही सुसज्ज होत्या. पण याही वेळेस काही प्रमाणत जल प्रदूषण हे नेहमीप्रमाणे दिसून आलेच. कमीत कमी प्रदूषण करत आपले सण साजरे करू. हाच विचार मनी ठेऊन काल 'क्लिनेथोन ५.०' बीच क्लीनिंगमध्ये असंख्य मुंबईतील विद्यार्थ्यांबरोबर मी सहभाग घेतला." हेही वाचा – ‘आता होऊ दे धिंगाणा २’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; पाहा जबरदस्त प्रोमो "पर्यावरण रक्षणासाठी सरकार जागरूक आहे. परंतु ही जबाबदारी फक्त सरकारचीच नाही. यासाठी आपण सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. जे काही निसर्गाचं देणं आपल्याला लाभलं आहे, ते सांभाळून ठेवणं. तसेच प्रकृतीला आपल्या कृत्यामुळे कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घेणे. पर्यावरणाचा ढासाळत चाललेला हा समतोल सांभाळणे आता आपली जबाबदारी आहे. जर आपण आज पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर भविष्यात आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील हे निश्चित," असं उत्कर्षनं लिहीलं आहे. हेही वाचा – ‘स्टार प्रवाह’वर लवकरच येणार नवी मालिका; निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकरने केलं जाहीर दरम्यान, उत्कर्षच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो बिग बॉस मराठीमुळे अधिक प्रकाश झोतात आला. आता तो लवकरच लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वीर सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत उत्कर्ष दिसणार आहे.