Bigg Boss Marathi Ghanshyam Darode Elimination : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट होते. अरबाज पटेल, आर्या जाधव, निक्की तांबोळी, धनंजय पवार, अभिजीत सावंत, छोटा पुढारी घन:श्याम आणि सूरज चव्हाण या सात जणांना सगळ्यांनी मिळून नॉमिनेट केलं होतं. त्यामुळे यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.
भाऊच्या धक्का ( Bigg Boss Marathi ) सुरू होण्याआधी सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या ट्रेंडनुसार घन:श्यामला सर्वात कमी मतं मिळाली होती. तसेच गेल्या काही आठवड्यापासून घन:श्याम नीट खेळतही नव्हता. त्यामुळे तो घराबाहेर होण्याची चिन्ह तुलनेने जास्त होती. अखेर रितेश देशमुखने नॉमिनेटेड सदस्यांना घरात मध्यभागी बसण्यास सांगितलं.
हेही वाचा : “ज्यांना नारळ मिळणार ते घराबाहेर…”, रितेशच्या घोषणेनंतर जान्हवीला अश्रू अनावर; नेटकरी म्हणाले, “ही रडतेय म्हणजे अरबाज…”
Bigg Boss Marathi : घन:श्यामने कोणाला केलं वारसदार?
रितेशने सर्वप्रथम सूरजचं अभिनंदन करत त्याला सेफ केलं. कारण, त्याला सर्वाधिक मतं मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अभिजीत सावंतला सेफ करण्यात आलं. पुढे, तिसऱ्या क्रमांकावर रितेशने निक्की सेफ आहे असं जाहीर केलं. यानंतर उर्वरित सदस्यांना एलिमिनेशन राऊंडसाठी बोलवण्यात आलं. रितेश यावेळी म्हणाला, “ज्याच्या बॉक्समध्ये मोदक असेल ते सदस्य सेफ असतील, तर ज्यांच्या बॉक्समध्ये काहीच नसेल ते घराबाहेर होतील. त्यांना थेट नारळ मिळेल.”
धनंजय व आर्याने सर्वप्रथम बॉक्स उघडले आणि त्यात मोदक होते. यानंतर अरबाज-घन:श्यामने बॉक्स उघडले…अरबाज सेफ झाला तर, घन:श्याम घराबाहेर झाल्याचं स्पष्ट झालं. घन:श्याम एलिमिनेट झाल्यावर वैभव-अरबाज काहीसे भावुक झाले होते. जाता जाता घन:श्यामने अरबाजचं कौतुक करत त्याला चांगलं खेळ असा सल्ला दिला. मात्र, छोट्या पुढारीने म्युच्युअल फंडच्या कॉइनचा वारसदार दुसऱ्याच सदस्याला बनवलं.
अरबाज, निक्की, वैभव या तिघांना डावलून घन:श्यामने सूरजला त्याच्या ५० पॉईंट्सच्या कॉइनचा वारसदार बनवलं. त्याचा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. पण, ‘टीम बी’ ( Bigg Boss Marathi ) कडून त्याच्या निर्णयाचा कौतुक करण्यात आलं. याशिवाय सूरजने देखील त्याचे आभार मानले.