Bigg Boss Marathi Jahnavi Killekar And Ghanshyam Darode : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अनेक स्पर्धकांचे एकमेकांशी वाद झाले तर, काही स्पर्धक शेवटपर्यंत एकत्र आपली मैत्री सांभाळून खेळले. काही सदस्यांनी ते वाद शोपुरतेच मर्यादित ठेवत बाहेर येताच आपली मैत्री कायम जपली आहे. तसाच काहीसा अनुभव घन:श्याम आणि जान्हवीच्या बाबतीत प्रेक्षकांना आला. हे दोघे सुरुवातीला ‘टीम ए’मधून खेळत होते. त्यानंतर यांच्या मैत्रीत फूट पडली. दोघांची घरात भांडणं सुद्धा झाली. पण, शो संपताना या दोघांनी सगळी भांडणं, वाद विसरून भावा-बहिणीचं नातं कायम जपलं आहे. शोमध्ये झालेली सगळी भांडणं विसरून घन:श्याम नुकताच मुंबईत जान्हवी किल्लेकरच्या घरी तिला भेटण्यासाठी गेला होता.

घन:श्याम अलीकडेच कामानिमित्त मुंबईत आला आहे. इथे आल्यावर सर्वप्रथम तो आपल्या निक्की ताई आणि अरबाज भाईला भेटला. या दोघांबरोबरचा खास व्हिडीओ घन:श्यामने सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर छोटा पुढारी जान्हवी किल्लेकरला भेटण्यासाठी तिच्या राहत्या घरी गेला होता. यावेळी अभिनेत्री व तिचे पती किरण किल्लेकर यांनी त्याचा मोठ्या आपुलकीने पाहुणचार केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

जान्हवीच्या घरी जाऊन तिची भेट घेतल्यावर घन:श्यामने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ ( Bigg Boss Marathi ) शेअर केला आहे. यामध्ये दोघांमध्ये नेमका का संवाद चालूये जाणून घ्या…

हेही वाचा : झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क

घन:श्याम व जान्हवी यांच्यातील मजेशीर संवाद

घन:श्याम – नमस्कार, तुम्ही सर्वजण कसे आहात? आज आपल्याबरोबर आहे ज्यांनी ‘बिग बॉस’ गाजवलं अशा टास्क क्वीन, किल्लर गर्ल… जान्हवी मॅडम. ज्या भाऊबीजेच्या दिवशी भावाला भेटायला आल्या नव्हत्या. पण, मी त्यांना भेटायला आलोय. आमच्या दाजींनी आग्रह केल्यामुळे मी खास आलोय. कशा आहात जान्हवी मॅडम?

जान्हवी – मी मस्त आहे घन:श्याम सर ( दोघेही एकमेकांकडे बघून हात जोडतात ) तुम्ही कसे आहात?

घन:श्याम – दाजींमुळे मी हिच्या घरी आलो आहे…हिच्यामुळे अजिबात नाही.

जान्हवी – हो…तुझ्या दाजींनी जेवण बनवलं ना आजचं? इतकं स्वादिष्ट जेवण मी याच्या बनवलेलं पण, याला त्याची काहीच किंमत नाहीये.

घन:श्याम – अरे सगळ्याच बहिणी म्हणतात किंमत नाहीये. ( मिश्किलपणे छोटा पुढारी पुढे म्हणतो ) खरंच आमच्या जान्हवीच्या सासूबाईंनी एक नंबर जेवण बनवलं होतं. पण, तशी माझी बहीण अन्नपूर्णा आहे.

जान्हवी – तू कधीच सुधारणार नाही ना घन:श्याम? हे ‘बिग बॉस’चं घर नाहीये. आपण बाहेर आलोय आता घरातून.

घन:श्याम – हे बिग बॉसचं ( Bigg Boss Marathi ) नाही आमच्या दाजींचं घर आहे.

छोटा पुढारी घन:श्यामची उत्तरं ऐकून शेवटी जान्हवी हसून-हसून नि:शब्द झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : संकर्षण कऱ्हाडेच्या भावाची ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री! त्याचं नाव काय, कोणती भूमिका साकारणार?

दरम्यान, शेवटी घन:श्यामने आपल्या मानलेल्या बहिणीचे म्हणजेच जान्हवी व तिच्या नवऱ्याचे मनापासून आभार मानले. छोटा पुढारीने हा व्हिडीओ “Task Queen जान्हवीताई ची ग्रेट भेट…!” असं कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नेटकरी सुद्धा या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader