Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा सातवा आठवडा नुकताच सुरू झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घरात नव्या वाइल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झालेली आहे. प्रसिद्ध बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने ‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे.

संग्रामची घरात एन्ट्री झाल्यावर त्याचे पहिल्याच दिवशी निक्की-अरबाजबरोबर खटके उडाले. आता संग्राम पुढच्या प्रवासासाठी कोणत्या सदस्यांबरोबर मैत्री करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. घरात ‘ए टीम’ फुटल्यापासून मैत्रीचं समीकरण बदललं आहे. आधी निक्की-जान्हवी एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी होत्या. परंतु, आता दोघी एकमेकींशी उठता-बसता भांडणं करत असतात. एवढंच नव्हे तर आधी आर्याला डोळ्यासमोर न बघणारी जान्हवी गेल्या काही दिवसांपासून घरात तिच्याबरोबर वावताना दिसत होती. पण, या दोघींची चार दिवसांची मैत्री आता पुन्हा एकदा तुटणार आहे.

हेही वाचा : Video : ‘बिग बॉस’च्या घरात जिनिलीयाने पाठवले उकडीचे मोदक! सगळे झाले खूश पण, सूरजच्या ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक

जान्हवी-आर्यामध्ये वाद

आर्या-जान्हवीचे वाद गेल्या दोन आठवड्यांपासून होत नव्हते. दोघीही एकमेकींशी खूपच चांगल्या पद्धतीने वागत होत्या. पण, आता पुन्हा एकदा यांच्या मैत्रीत वादाची ठिणगी पडणार आहे. जान्हवी आणि आर्यामध्ये घरच्या कामांवरून वाद झाल्याचं नव्या प्रोमोमध्ये ( Bigg Boss Marathi ) पाहायला मिळत आहे.

जान्हवी यात आर्याला म्हणते, “तुला बाथरुम स्वच्छ करता येत नाही, तुला भांडी घासता येत नाही मग काय करता येतं तुला?” यावर आर्या तिला म्हणते, “तू स्वत: आधी क्लिनिंग कर” पुढे, जान्हवी “मला घाण दिसली, तर दिसली आर्या” असं तिला ठणकावून सांगते आणि दोघींमधलं भांडण वाढत जातं.

Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकर

हेही वाचा : Bigg Boss Marathi- Video : …अन् वर्षा उसगांवकरांनी अरबाजला दाखवला ठसका! निक्की सुद्धा लाजली; घरात हास्यकल्लोळ, पाहा प्रोमो

आर्या शेवटी म्हणते, “तू एकटी सांगतेय तर क्लिअर दिसतंय तू काय करतेय जान्हवी” यावर जान्हवी आर्याला म्हणते, “तुला घाण करायला आवडते तर, घाणेरड्यासारखीच राहा…” कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या दोघींच्या भांडणाची खिल्ली उडवली आहे. एका युजरने या प्रोमोवर “हे काय नवीन नाही आहे. हे असं होणारच आहे यापुढे पण… कोणी कितीही येऊ द्या… या दोघीही सुधारणार नाहीत.” अशी कमेंट केली आहे. तर, हा प्रोमो पाहून आणखी एका नेटकऱ्याने “बघ बाबा संग्राम आता तूच आणू शकतो या दोघींना वळणावर.” असं म्हटलं आहे. आता जान्हवी-आर्यामधले वाद मिटणार की आणखी वाढणार हे येत्या भागात स्पष्ट होणार आहे.