Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी' हा शो तब्बल २ वर्षांनी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा चालू झाला आहे. यंदाच्या पाचव्या पर्वात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत. पहिल्याच आठवड्यात या सगळ्या सदस्यांमध्ये आपआपसांत जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता 'बिग बॉस'च्या घरात दोन ग्रुप पडल्याचं दिसत आहे. यापैकी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही निक्की तांबोळीच्या ग्रुपमध्ये आहे. वीकेंडच्या वारला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सुद्धा जान्हवीला "निक्कीची सावली बनून राहू नकोस" असा सल्ला दिला आहे. निक्की अन् वर्षा यांची पहिल्या दिवसापासून भांडणं सुरू आहेत. यातच जान्हवीने सुद्धा वर्षा यांना चुकीची वागणूक दिल्याने सध्या सगळे प्रेक्षक तिच्यावर चांगलेच संतापले आहेत. 'बिग बॉस'च्या घरात पहिल्या आठवड्यात जान्हवीला एकटीला बेडवर झोपण्याची मुभा मिळाली होती. पण, निक्की अन् ती जमिनीवर एकत्र झोपायचंय असं वर्षा यांना सांगतात. यामुळे वर्षा उसगांवकरांना रात्री अंथरुण घालून दरवाजात झोपावं लागतं. याबाबत घरातील इतर सदस्य जान्हवीला जाब विचारतात. 'कलर्स मराठी वाहिनी'ने याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘भाऊचा धक्का’ गाण्याचा गायक, गीतकार अन् संगीतकार आहे ‘बिग बॉस’मध्ये झळकलेला ‘हा’ स्पर्धक, पोस्ट करत म्हणाला… जान्हवी यात म्हणते, "हे माझं प्लॅनिंग होतं…फक्त ताईंना थोडा त्रास द्यायचा होता. कारण, आम्हाला माहितीये ताई मोठमोठ्याने भांडत नाहीत." यावर अभिजीत म्हणतो, "त्यात समस्या अशी झाली की, त्यांना रस्त्यात झोपावं लागलं…मला त्यांच्या बेडवरून चालत जावं लागलं. आज पूर्ण महाराष्ट्र बघतोय की, वर्षा ताईंसारखा एक मोठा कलाकार रस्त्यात झोपतोय आणि आम्ही त्यांच्या बेडवरून चालत जातोय." यावर जान्हवी म्हणते, "मी काल त्यांच्याशी बोलताना कोणतीही मर्यादा ओलांडली नाही." यानंतर घरातील इतर सदस्य "तू बोलली नसशील पण तसं वागणं तुझ्याकडून झालंय" असं तिला सांगतात. हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘डबल ढोलकी’ म्हणणाऱ्या सदस्यांना अभिजीत सावंतचं गाण्यातून उत्तर, पाहा व्हिडीओ 'बिग बॉस मराठी'चे प्रेक्षक जान्हवीवर भडकले ( Bigg Boss Marathi ) "वर्षाताईंना जमिनीवर झोपावं लागतंय म्हणून अभिजीतला वाटतंय वाईट" असं कॅप्शन देत 'कलर्स मराठी वाहिनी'ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे, "काय जान्हवी अगं मालिकेत साइड रोल करणारी तू…जान्हवी बाई तुझं वय आहे ना तेवढ्या सुपरहिट फिल्म्स त्या वर्षा मॅमनी केल्या आहेत" तर, दुसरा नेटकरी म्हणतो, "लाज पण नाही वाटत या जान्हवीला… हिच्या वयाच्या आहेत का वर्षा ताई…विकृत प्रवृत्तीचे लोकच असा विचार करत असतील… खेळामध्ये ठिके पण सारखं - सारखं काय आहे", "जान्हवीचे संस्कार दिसून येत आहेत किती माज आहे तिला", "जान्हवी तुला लाज वाटते का?" प्रेक्षकांच्या अशा संतप्त कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. जान्हवी किल्लेकरवर प्रेक्षक संतापले ( Bigg Boss Marathi ) दरम्यान, रितेश देशमुखने चुका सांगितल्यावर आता येत्या आठवड्यात जान्हवी काय सुधारणा करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. याशिवाय Bigg Boss Marathi हा शो प्रेक्षकांना रोज रात्री ९ वाजता 'कलर्स मराठी वाहिनी' व 'जिओ सिनेमा'वर पाहता येणार आहे.