Bigg Boss Marathi Fame Jahnavi Killekar And Suraj Chavan Bhaubeej : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपलं जरी असलं तरी यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकांनी आपली नाती शो संपल्यावर देखील निभावली आहेत. रक्षाबंधनाच्या सणाला जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण यांनी ‘बिग बॉस’च्या घरात रक्षाबंधन साजरं केलं होतं. तेव्हाच अभिनेत्रीने आपण भाऊबीज सुद्धा साजरी करायची असं सूरजला सांगितलं होतं.

सूरजचं बालपण अत्यंत बेताच्या परिस्थिती गेलं. लहानपणीच आई-बाबांचं छत्र हरपलं. यानंतर त्याच्या बहि‍णींनी त्याचा सांभाळ गेला. पण, ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश घेतल्यावर सूरज आता अवघ्या महाराष्ट्राचा लाडका मुलगा झाला आहे. घरामध्ये त्याला जान्हवी, अंकिता, इरिनाच्या रुपात आणखी बहिणी मिळाल्या. काही दिवसांपूर्वीच जान्हवीने सूरजच्या मोढवे गावी जाऊन त्याची भेट घेतली होती. यावेळी ती भाऊबीजेला पुन्हा येईन असं म्हणाली होती. अखेर अभिनेत्रीने तो शब्द खरा करून दाखवला आहे.

bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel video call
निक्की तांबोळीने केला सूरज चव्हाणला Video कॉल! सोबतीला होता अरबाज; म्हणाली, “भावा लवकरच…”

हेही वाचा : मराठी लेखकाने लिहिलीये Singham Again ची कथा! वीकेंडची कमाई पाहून म्हणाला, “रोहित शेट्टी सर…”

जान्हवी तिचे पती किरण किल्लेकर व मुलगा इशान यांच्या सोबतीने सूरजला भेटण्यासाठी पुन्हा एकदा त्याच्या गावी पोहोचली आहे. याचा व्हिडीओ चांगभलं न्यूज या युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे.

जान्हवी यामध्ये म्हणाली, “मी आज यायचंच असं ठरवून आले होते…भाऊबीज आहे त्यामुळे माझ्या भावाला भेटण्यासाठी खास मी आज आले आहे. तसं मी त्याला वचन दिलं होतं. मी गेल्यावेळी आले तेव्हा त्याला सांगितलं होतं…भाऊबीजेला नक्की येईन आणि तो शब्द मला पाळायचा होता. ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात मी सूरजला राखी सुद्धा बांधली होती. त्याच्यामुळे यायचं हे १०० टक्के ठरलं होतं.”

हेही वाचा : मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

Bigg Boss Marathi Fame Jahnavi Killekar And Suraj Chavan
जान्हवी व सूरज ( Bigg Boss Marathi Fame Jahnavi Killekar And Suraj Chavan )

किरण किल्लेकर काय म्हणाले?

पुढे, किरण किल्लेकर या दोघांबद्दल ( Bigg Boss Marathi ) म्हणाले, “बिग बॉसच्या घरात मी जेव्हा या लोकांना भेटायला गेलो होतो. तेव्हाच मी त्याला म्हणालो होतो, बघ बहीण आहे सांभाळून घे…आणि त्याने तिला खूप सांभाळून घेतलं. त्याचं बॉण्डिंग बघून मलाही छान वाटलं. आमचा मुलगा देखील सूरजचा फॅन झाला होता. तो मला म्हणायचा मम्मा आत नसती तर मी फक्त सूरजलाच सपोर्ट केला असता.”

Story img Loader