Bigg Boss Marathi Fame Meenal Shah : ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाचे आतापर्यंत एकूण पाच सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या शोमध्ये सहभागी झालेल्या आजवरच्या प्रत्येक सदस्याला प्रेक्षकांची पसंती व लोकप्रियता मिळाली आहे. ‘रोडीज’सारखा शो केल्यावर अभिनेत्री मीनल शाहने ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात एन्ट्री घेतली होती.

उत्तम स्वभाव, सर्वांना सांभाळून घेत पुढे जाण्याची वृत्ती, टास्कमधली चपळता, ‘बिग बॉस’च्या घरात जपलेली मैत्री आणि फेअर खेळ यामुळे मीनलला महाराष्ट्राच्या घराघरांत पसंती मिळाली. मीनलने तिसऱ्या सीझनमध्ये अंतिम फेरीत टॉप-५ पर्यंत मजल मारली होती. ‘बिग बॉस’ संपल्यावर अभिनेत्रीने अनेक छोटे-मोठे शो करत आपली डान्सची आवड सुद्धा जोपासली. आता मीनल ( Bigg Boss Marathi ) वैयक्तिक आयुष्यातल्या एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.

sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव

मीनलने गोव्यात भलामोठा आलिशान बंगला बांधला आहे. याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातली ही गोड बातमी सर्व चाहत्यांना दिली आहे.

हेही वाचा : अवघ्या ६ महिन्यांत गाशा गुंडाळणार कलर्स मराठीची मालिका? मुख्य अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “शेवटचे काही…”

Bigg Boss Marathi – मीनलने गोव्यात बांधला आलिशान बंगला

गणपती बाप्पा मोरया!

…तर हे काही वर्षांपूर्वी सुरू झालं, जेव्हा आम्ही आमचं स्वप्नातलं घर बांधायचं ठरवलं. तेव्हा डोळ्यासमोर फक्त एक व्हिजन होतं आणि आम्ही सगळेजण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड उत्सुक होतो. ते स्वप्न अजिबात सोपं नव्हतं. परंतु, आज मागे वळून पाहताना प्रत्येक गोष्टीची किंमत कळतेय. घर बांधण्यासाठी उत्तम जागा शोधण्यापासून ते आम्हाला हवं तसं घर बांधेपर्यंत… प्रत्येक गोष्टीचा आम्ही विचार केला होता. सर्व गोष्टी एका रोलरकोस्टर राइडसारख्या होत्या. शेवटी आता आमचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे.

धनत्रयोदशीच्या शुभदिवशी आम्ही आमच्या गोव्याच्या ड्रीम हाऊसमध्ये गृहप्रवेश केला. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि देवाच्या कृपेने हे स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. यासाठी कित्येक रात्री न झोपता जागून काढल्या आहेत. मला स्वत:चा खूप अभिमान आहे. आज मी माझ्या प्रियजनांबरोबर गृहप्रवेश करत आहे. मी अतिशय कृतज्ञ आहे.

“सपने देखने से लेकर उनको पुरा करना तक का सफर” या प्रवासात अनेकांची साथ मिळाली.

गृहप्रवेश करताना एक विशेष गोष्ट घडली ती म्हणजे, या ड्रीम हाऊसमध्ये प्रवेश करताना माझी आजी देखील आली होती. ती एवढ्या लांब प्रवास करून आली हे माझं भाग्यच आहे. आज तिचं वय ९० हून अधिक आहे. गोव्याला येण्यासाठी तिने पहिल्यांदाच विमानाने प्रवास केला होता.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

दरम्यान, मीनलचं नवीन घर पाहून नेटकऱ्यांसह बिग बॉसमधल्या ( Bigg Boss Marathi ) सहस्पर्धकांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशाल निकम, सोनाली पाटील, विकास पाटील, मेघा धाडे यांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader