Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’मध्ये जान्हवी अन् आर्याला प्रत्येकी ३० हजार एवढी बीबी करन्सी मिळाली आहे. या करन्सीचा वापर दोघींना आपल्या वैयक्तिक गरजांसाठी करता येणार आहे. घरात आधीच दोन गट पडल्याने निक्की, जान्हवी, वैभव आणि अरबाज आर्याला मिळालेली बीबी करन्सी चोरायचं ठरवतात. निक्की आणि तिच्या टीमने केलेल्या या प्लॅनमुळे घरात मध्यरात्री भांडणं होतात. अभिजीत यावेळी “बेडवर येऊन तुम्ही असा त्रास देताय हे अत्यंत चुकीचं आहे” असं त्यांना सांगतो. घरात नेमकं काय घडलं आणि यावर काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत जाणून घेऊयात…

आर्याने आधीच अभिजीत, योगिता, धनंजय यांच्या मदतीने बीबी करन्सी लपवलेली असते. त्यामुळे निक्की आणि तिची टीम बेडरुममध्ये आर्याची करन्सी नेमकी कुठे लपवलीये याचा शोध घेत असतात. अशातच अरबाज आणि जान्हवी प्रत्येकाच्या बेडवर जाऊन करन्सी आहे की नाही याची झडती घेत असतात. अभिजीतच्या बेडकडे जाऊन त्याला निक्की, जान्हवी, वैभव, अरबाज असे चौघेही जण घेरतात. त्यामुळे गायक प्रचंड संतापतो.

Yogita Chavan
“योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Bigg Boss Marathi Season 5 Varsha Usgaonkar these decisions are appreciated by netizens
Bigg Boss Marathi : “वर्षाताई एक नंबर…”, वर्षा उसगांवकरांच्या ‘या’ निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, नेमकं काय घडलंय? वाचा
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
bigg boss marathi megha dhade shared angry post for jahnavi killekar
“ही आगाऊ कार्टी जान्हवी…”, मेघा धाडेची संतप्त पोस्ट! सलमान खानचा उल्लेख करत रितेशला केली ‘अशी’ विनंती, म्हणाली…
suraj chavan cleaning house Utkarsh Shinde comment
Video: “त्याला गेम नाही, पण माणसं कळली,” सुरज चव्हाणला केर काढताना पाहून उत्कर्ष शिंदे म्हणाला, “शिक्षण नसूनही कधी…”
Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
yogita chavan first reaction after eviction
“चुकीचे शब्द, लायकी काढणं…”, घराबाहेर आल्यावर योगिताची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “वर्षाताईंना खूप टार्गेट केलं”

हेही वाचा : Video : ऐश्वर्या नारकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त! व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “आपली बाजू समजून घेण्याची वेळ…”

अभिजीत म्हणतो, “तुम्ही असे अचानक धावून आलात, माझ्या हाताला लागलं… त्यात ही माझी पर्सनल स्पेस आहे तुम्ही असं अटॅक करू शकत नाही.” यावर जान्हवी त्याला सांगते, “एवढा नाजूक आहेस तर ‘बिग बॉस’मध्ये कशाला आलास…” यानंतर या सगळ्यांमध्ये मध्यरात्री जोरदार भांडणं सुरू होतात. वर्षा सुद्धा निक्की आणि तिच्या टीमने केलेल्या या कृतीवर भयंकर संतापतात. यावर घरातल्या सदस्यांनीच नव्हे तर हा शो पाहणाऱ्या मराठी कलाकारांनी देखील आक्षेप घेतला आहे.

Bigg Boss Marathi : मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथने ‘बिग बॉस’च्या घरात घडलेल्या या प्रसंगाचा स्क्रीनशॉट शेअर करत निक्की आणि टीमने केलेल्या कृतीबद्दल संताप व्यक्त केला आहे. “रात्री कोणाच्याही अंथरुणात जाणं खूप चुकीचं आहे आणि ही जान्हवी” याशिवाय या पोस्टवर रागाचा इमोजी जोडत तिने या चौघांना पोस्टमध्ये टॅग सुद्धा केलं आहे. याशिवाय अभिनेता आस्ताद काळेने देखील यावर भाष्य करत हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. मीरा, आस्ताद दोघेही यापूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी झाले होते.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : कोण होणार यंदाचा पहिला कॅप्टन? अरबाजने इतरांना थेट दिली धमकी, प्रोमो पाहून नेटकरी संतापले

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi मीरा जगन्नाथची पोस्ट चर्चेत

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’बद्दल सांगायचं झालं तर, आता लवकरच घरात कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. आता यामध्ये कोणता सदस्य बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.