Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या सातवा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात या सीझनच्या पहिल्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने घरात प्रवेश घेतला. सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर संग्राम चौगुले ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा पहिला वाइल्ड कार्ड ठरला. घरात येताच त्याने निक्की – अरबाज विरोधात खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

संग्रामने पहिल्याच दिवशी अरबाज – निक्कीला जादुई विहिरीत ढकलत त्यांच्याकडून या आठवड्याचं लक्झरी बजेट काढून घेतलं होतं. त्यामुळे आता टास्क झाला, तर अरबाज-संग्राम एकमेकांना भिडणार हे निश्चित होतं. नॉमिनेशन टास्कमध्ये एकूण ६ सदस्य नॉमिनेट झाल्यावर आता घरात ( Bigg Boss Marathi ) सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे.

हेही वाचा : Video : ऑस्ट्रेलियाहून भारतात परतली पूजा सावंत! नवऱ्यासह जोडीने घेतलं बाप्पाचं दर्शन; म्हणाली, “विमानाची तिकिटं…”

अरबाजचं अग्रेसिव्ह रुप पाहून नेटकरी संतापले

घरात कॅप्टन्सी टास्कसाठी ‘बिग बॉस’कडून ( Bigg Boss Marathi ) ‘टीम ए’ आणि ‘टीम बी’ असे दोन गट तयार करण्यात आले आहेत. यातील ‘ए टीम’मध्ये निक्की, अरबाज, वैभव, धनंजय, वर्षा आणि सूरज हे सदस्य आहेत. तर, ‘बी टीम’मध्ये अभिजीत, जान्हवी, संग्राम, पॅडी, अंकिता आणि आर्या हे सदस्य आहेत. टास्क सुरू होताच प्रत्येक टीमला जे सदस्य कॅप्टन पदासाठी उमेदवार म्हणून नको आहेत. त्यांच्या नावांच्या छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरून त्या बाद करायच्या होत्या. या टास्कचे संचालक निक्की आणि अभिजीत होते.

पहिल्या फेरीनंतर निक्कीच्या ‘टीम ए’ संग्राम आणि अभिजीत या दोन स्पर्धकांना बाद केलं. यानंतर दुसऱ्या फेरीत जान्हवी आणि आर्या या दोघींना बाद करण्यात आलं. आता उर्वरित सदस्यांमध्ये कोण कॅप्टन पदासाठी दावेदार होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, या संपूर्ण टास्कमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. आजच्या भागात सुद्धा प्रेक्षकांना तशीच भांडणं पाहायला मिळतील. अरबाजचं जोरजोरात ओरडणं, धक्काबुक्की करणं या गोष्टी नेटकऱ्यांना सुद्धा आवडल्या नाहीत. त्यामुळे अरबाजचं टास्कमधील अग्रेसिव्ह रुप पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा : अखेर दोन रांगडे गडी एकमेकांना भिडणार! संग्राम-अरबाजमध्ये कोण मारणार बाजी? कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले…

Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, नेटकऱ्यांनी हा प्रोमो पाहून “अरबाजला बाहेर काढा”, “संग्राम भाऊ त्या अरबाजला हाणा”, “बिग बॉसचं घर आहे की ताकदीची स्पर्धा, संग्राम भाऊ तुम्ही लढा”, “हा सगळा आटापिटा वैभवला कॅप्टन बनवण्यासाठी सुरू आहे”, “तुम्हाला घाबरतो दादा… अरबाज नाटक आहे फक्त” अशा कमेंट्स केल्या आहेत. या टास्कमध्ये आता कोण बाजी मारणार हे आगामी भागात स्पष्ट होईल.