Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे. घरात आजच्या भागात कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. आता ही 'कॅप्टन्सी कंटेन्डर'ची बस कोण पकडणार आणि कोणाची बस सुटणार? हे प्रेक्षकांना गुरुवारच्या भागात पाहायला मिळेल. 'बिग बॉस'च्या घरात कॅप्टन पद मिळवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे सगळ्याच सदस्यांमध्ये या पदासाठी अटीतटीची लढाई होणार आहे. यात शेवटी कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात सहाव्या आठवड्यात निक्की तांबोळीचे सर्वांशी वाद होत असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. आता हेच वाद कॅप्टन्सी कार्यात देखील पाहायला मिळतील. गेल्या आठवड्यात 'जोडीचा मामला' टास्कमध्ये निक्की-अभिजीतची चांगलीच मैत्री जमली होती. परंतु, या आठवड्यात हे समीकरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. हेही वाचा : Video : “संध्याकाळी ५.३० वाजता Dinner, लवकर झोपते अन्…”, लेक वामिकामुळे बदलली अनुष्का शर्माची दिनचर्या; म्हणाली… निक्की टास्कमध्ये ( Bigg Boss Marathi ) अभिजीतवर आरोप करत त्याच्याशी वाद घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की अभिजीतला म्हणते, "तू डबल ढोलकी आहेस" यावर अभिजीत तिला "शब्द आधी व्यवस्थित वापर…मग, डोक्यात पण विचार व्यवस्थित येतील" असं सांगतो. यानंतर निक्की म्हणते "तू आधी डोकं लावून विचार कर" या दोघांची भांडणं पाहून घरातील अन्य सदस्य मात्र खळखळून असतात. Bigg Boss Marathi : अंकिता काय म्हणाली? निक्की-अभिजीतच्या मैत्रीमुळे यापूर्वी घरात अनेक वाद झाल्याचं पाहायला मिळालं. पण, आता दोघांच्या भांडणाची घरातील अन्य सदस्य मजा घेत होते. डीपी म्हणतो, "घरातले २२ कॅमेरे आता तुमच्यावर आहेत. थांब आता" पुढे, अंकिता म्हणते, "आता या कॅप्टन्सीचं एक वेगळं नाव असेल… दोघात तिसरा आणि आता कॅप्टन्सी विसरा…" हेही वाचा : आलिया भट्ट करणार लाडक्या भावाचं रक्षण, ‘जिगरा’ची पहिली झलक आली समोर, ‘या’ तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित Bigg Boss Marathi हेही वाचा : सई लोकूरने पहिल्यांदाच दाखवला लाडक्या लेकीचा चेहरा! फोटो शेअर करत म्हणाली, “आज आई म्हणून…” अंकिता आणि धनंजयची डायलॉगबाजी ऐकून घरातल्या सगळ्यांनाच हसु अनावर झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता घराचा कॅप्टन कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. या आठवड्यात जो सदस्य कॅप्टन होईल त्याला सातव्या आठवड्याची इम्युनिटी मिळेल. त्यामुळे हे कार्य प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे.