Bigg Boss Marathi Nikki And Arbaz : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व भांडणं, टास्क, वादविवाद, मैत्री याशिवाय अरबाज-निक्कीच्या नात्यामुळे चर्चेत राहिलं. पहिल्या आठवड्यापासून घरात या दोघांच्या प्रेमाचे वारे वाहू लागले होते. अरबाजने चक्क निक्कीसाठी टोमॅटोचं हृदय वगैरे अशा सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या. साधारण दोन आठवड्यांपूर्वी अरबाजने या घराचा निरोप घेतला. यामुळे निक्की प्रचंड भावुक झाली होती.
अरबाजच्या एक्झिटनंतर ती ढसाढसा रडली होती. मात्र, यानंतर पार पडलेल्या ‘फॅमिली वीक’ टास्कमध्ये निक्कीचे आई-वडील घरात आले. यावेळी प्रमिला तांबोळी यांनी, “बाहेरील जगात अरबाजचं नाव अनेक मुलींबरोबर जोडलं गेलंय आणि त्याचा साखरपुडा झाल्याचं कानावर आलंय” असं आपल्या लेकीला सांगितलं. यानंतर संतापलेल्या निक्कीने अरबाजचं सर्व सामान उचलून स्टोअर रुममध्ये फेकून दिलं होतं. फिनालेच्या एक दिवस आधी संपूर्ण सीझनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक दरवर्षी ‘बिग बॉस’च्या घरात रिएन्ट्री घेतात. यावेळी अरबाज सुद्धा आला होता.
निक्कीने व्यक्त केल्या भावना
अरबाजने घरात प्रवेश केल्यावर लगेच निक्कीला उचलून घेतलं आणि तो तिला बेडरुम एरियामध्ये घेऊन गेला. यावेळी अरबाज प्रचंड भावुक झाला होता. यावेळी निक्कीने त्याच्याकडे सगळी विचारपूस केली. अरबाजने, “सगळ्या अफवा असून माझा साखरपुडा झालेला नाहीये” असं स्पष्टीकरण तिला दिलं.
शेवटी घरातून बाहेर पडताना अरबाज तिला म्हणाला, “तू माझ्यासाठी काय फिल करतेस?” यावर निक्की म्हणते, “तुला माहितीये… मी काय बोलू? तू मला आवडतोस आणि माझ्यासाठी तू खूप जास्त महत्त्वाचा आहेस. मला भिती वाटत होती की, या सगळ्या अफवा खऱ्या असतील, तर मी तुझ्यापासून वेगळी होते.”
हेही वाचा : “अरबाज घाणेरडा गेम खेळला…”, घरात पुन्हा एन्ट्री घेतल्यावर वैभवचं विधान! जान्हवीला म्हणाला…
“आज तुला पाहून मला खरंच खूप जास्त छान वाटतंय. तुला काय सांगू मी या घरात तुझ्याशिवाय कशी राहिली असेन. आता अंकिता-डीपी एकत्र आहेत. सूरजपण त्यांच्याबरोबरच आहे. दुसरीकडे मी, जान्हवी आणि अभिजीत आम्ही तिघं जण आहोत. माझी बाहेर जाऊन तू वाट बघ… मी लवकरच येईन. मला आता फक्त तूच पाहिजे बस्स…” अशाप्रकारे भावना व्यक्त केल्यावर निक्की त्याला, “मी तुला हवीये ना…मोठ्याने सांग” असा प्रश्न विचारते. यावर अरबाज ‘हो’ असं उत्तर देतो.
दरम्यान, आता ‘बिग बॉस’मधून ( Bigg Boss Marathi ) बाहेर आल्यावर निक्की आणि अरबाजचं नातं पुढे काय वळण घेणार… निक्की सगळ्या गोष्टी स्वीकारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.