Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आजपासून आठवा आठवडा सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यात वैभवने घरातून एक्झिट घेतली. तर, निक्कीला कानशिलात लगावल्याप्रकरणी आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यामुळे गेल्या आठवड्यात एकूण दोन सदस्य घराबाहेर पडले. आता घरात एकूण १० सदस्य असून, यांच्यापैकी आज कोण नॉमिनेट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नॉमिनेशन टास्क व्यतिरिक्त घरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना संग्राम आणि निक्की यांच्या जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळेल. याचा प्रोमो ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यापासूनच निक्की-संग्रामध्ये टोकाचे वाद होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. आताच्या भांडणांमध्ये निक्कीने संग्रामला थेट फुस्की बॉम्ब म्हटल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
Bigg Boss Marathi : निक्की संग्रामला म्हणाली ‘फुस्की बॉम्ब’
संग्राम निक्कीला म्हणतो, “जवळच्या माणसांना आधी खड्ड्यात घालायचं” यावर निक्की म्हणते, “फुस्की बॉम्बसारखं या घरात अप्रत्यक्षपणे बोलायचं नाही. दम असेल तर तोंडावर बोलून दाखवा. स्वत:चं डोकं वापरा आणि नीट बोला. ना तळ्यात ना मळ्यात अशी परिस्थिती तुमची झाली आहे” निक्कीचं म्हणणं ऐकल्यावर संग्राम पुढे बोलतो, “कोणत्या गोष्टी कशा घ्यायच्या ना हे सगळं तुम्ही ठरवताय. तुमच्यातल्या एकाला तुम्हीच बाहेर काढणार आहे”
हेही वाचा : ‘बिग बॉस’च्या घरात येताच रितेश देशमुखने उघडला फ्रिज अन् पाहिली ‘ती’ गोष्ट; सगळेच खळखळून हसले, नेमकं काय घडलं?
दरम्यान, संग्रामबद्दल सांगायचं झालं तर, तो मूळचा कोल्हापूरचा आहे. प्रसिद्ध बॉडीबिल्डर म्हणून त्याला ओळखलं जातं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या आठवड्यात त्याने घरात वाइल्ड एन्ट्री घेतली आहे. त्याच्याकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या मात्र, तुम्ही घरात एन्ट्री घेतल्यावर ‘वाइल्ड कार्ड’ नाहीतर ‘माइल्ड कार्ड’सारखे खेळलात असं रितेशने त्याला भाऊच्या धक्क्यावर सांगितलं. आता यानंतर या आठवड्यात संग्राम त्याच्या गेममध्ये काय बदल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.