Bigg Boss Marathi Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता दहाव्या आठवड्याला सुरुवात झाली असून, सर्व सदस्यांनी ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला सुरुवात केली आहे. आज घरात ‘तिकीट टू फिनाले’साठी एक महत्त्वाचा टास्क पार पडला. यासाठी घरात खास बाबागाडी आणण्यात आली होती. घरातील सदस्यांना कमीत कमी वेळेत हा टास्क पूर्ण करून ‘तिकिट टू फिनाले’साठी उमेदवारी मिळवायची होती.

अरबाजने दिलेल्या म्युचुअल फंड्समधील कॉइन्समुळे निक्कीला शेवटच्या आठवड्यात मोठा फायदा झाला. तिला थेट ‘तिकीट टू फिनाले’ची उमेदवारी मिळाली. यावेळी घरातील सदस्यांना एकमेकांची किंमत ठरवायची होती. यासाठी बिग बॉसने ६ लाख, ४ लाख अशा विविध पाट्या घरात पाठवल्या होत्या. घरातील सदस्यांनी सर्वानुमते सूरजला ६ लाख, वर्षा यांना ४ लाख, अभिजीतला ३ लाख, अंकिताला २ लाख, धनंजयला १ लाख आणि जान्हवीला ४० हजार किंमतीची पाटी दिली. यानंतर या सदस्यांमध्ये ‘बाबागाडी’चा टास्क पार पडला.

aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
arbaz patel post after nikki tamboli safe bigg boss marathi 5
Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी सुरक्षित होताच अरबाज पटेलची प्रतिक्रिया, म्हणाला…
Arbaaz Patel And Nikki Tamboli
“तिच्यासाठी माझ्या मनात…”, बिग बॉसच्या घराबाहेर येताच निक्कीबरोबरच्या नात्यावर अरबाज पटेलचं भाष्य; म्हणाला, “माझी चूक…”
Rakhi Sawant
‘या’ स्पर्धकाने जिंकावा शो, राखी सावंतने ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाऊन आल्यावर व्यक्त केली इच्छा; शेअर केला व्हिडीओ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Arbaz Patel reacts on engagement claim by nikki tamboli mother
Bigg Boss Marathi: “माझा साखरपुडा…”, निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”

हेही वाचा : ‘बिग बॉस’च्या घरात आली बाबागाडी…; ‘तिकीट टू फिनाले’साठी रंगणार अनोखा टास्क, ७ सदस्यांमध्ये कोण मारणार बाजी?

बाबागाडीच्या टास्कमध्ये सूरजने इतर सदस्यांपेक्षा चांगली कामगिरी करत बाजी मारली. त्यामुळे त्याच्या गळ्यातील ६ लाखांची पाटी बक्षिसाच्या रुपात मूळ रकमेत जमा करण्यात आली. यापूर्वी २५ लाखांमधील १६ लाख ४० हजार गमावल्याने ‘बिग बॉस’च्या विजेत्याला ८ लाख ६० हजार मिळणार होते. मात्र, सूरजच्या पाटीचे ६ लाख जमा झाल्याने आता विजेत्या स्पर्धकाला १४ लाख ६० हजार एवढी रक्कम मिळेल असं ‘बिग बॉस’ने जाहीर केलं आहे.

अरबाजची खास कमेंट

बाबागाडीच्या टास्कनंतर निक्की आणि सूरजमध्ये ‘तिकीट टू फिनाले’साठी अनोखा टास्क पार पडला. यामध्ये निक्कीने बाजी मारली आणि ती यंदाच्या पर्वाची पहिली फायनलिस्ट ठरली आहे. अरबाज पटेलने या पोस्टवर “स्ट्राँग आणि ट्रॉफी जिंकून ये” असं दर्शवणारे इमोजी कमेंटमध्ये दिले आहेत. मात्र, नेटकऱ्यांनी निक्कीने ‘तिकीट टू फिनाले’ जिंकल्याने नाराजी व्यक्ती केली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “अभिजीत अरबाजचं सॉफ्ट व्हर्जन, तो चेहऱ्यावर मुखवटा…”, घराबाहेर आल्यावर पंढरीनाथ कांबळेचं मोठं विधान; म्हणाला…

Bigg Boss Marathi Nikki Tamboli
Bigg Boss Marathi Nikki Tamboli

“हिला अरबाजच्या म्युचुअल फंड्समुळे फुकटात उमेदवारी मिळाली”, “कोणालाही ही निक्की जिंकली तर आवडणार नाही”, “निक्की तू तिकीट टू फिनाले जिंकलीस तरी विजेता होणार सूरज”, “आम्ही कधीच अपेक्षा सोडली आहे बिग बॉसकडून” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर ( Bigg Boss Marathi ) केल्या आहेत. आता ग्रँड फिनालेला कोण बाजी मारणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.