Bigg Boss Marathi Captaincy Task : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात घरात कॅप्टन्सी उमेदवारीचा टास्क पार पडला. यामध्ये अरबाजच्या ‘ए टीम’ने बाजी मारली. यामुळे निक्कीसोडून या टीममधले चार जण कॅप्टन पदासाठीची अंतिम लढत खेळणार आहेत. अरबाज, सूरज, वर्षा आणि डीपी यांच्यात कॅप्टन पदासाठीचा पुढचा टास्क पार पडणार आहे. या टास्कमधला विजयीसदस्य घराचा नवीन कॅप्टन होणार आहे. या टास्कबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना एक अनोखा टास्क दिला आहे. “कोणाचं गोड पाणी… कोणाची तहान भागवणार?” असं या टास्कचं नाव आहे. प्रोमोमध्ये घरातील प्रत्येक सदस्यासमोर पाण्याचे डबे असल्याचं पाहायला मिळत आहे. दावेदार असलेल्या सदस्यांच्या डब्यातील पाणी अन्य सदस्यांनी प्यायचं आहे. मात्र, यातलं पाणी खरंच गोड आहे की नाही? याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे, प्रोमोमध्ये या डब्यातील पाणी प्यायलानंतर काही सदस्यांना त्रास होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “असं नको खेळू, तसं नको…”, सूरजला सल्ले देणाऱ्या अंकितावर मराठी अभिनेत्री संतापली; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

घरात कॅप्टन्सीसाठी दावेदार असणाऱ्या सदस्यांनी आपल्या डब्यातील पाणी प्यावं अशी विनंती अन्य सदस्यांना करायची आहे. यानुसार अरबाज “हे खूप गोड पाणी आहे” असं सांगत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. यावर निक्की म्हणते, “कालपासून तुझ्यात एवढा कडूपणा होता अचानक पाणी गोड कसं झालं?”

पॅडीने वर्षा यांना विचारला जाब

गेल्या काही दिवसांपासून वर्षा उसगांवकर ‘टीम बी’ला डावलून अरबाज-निक्कीबरोबर Strategy करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंढरीनाथ कॅप्टन्सी टास्कमध्ये त्यांना थेट जाब विचारत म्हणतो, “तुम्हाला विश्वास होता का आम्ही पाणी पिऊ?…. ताई तुम्ही Strategy करायला त्यांच्याबरोबर बसणार आणि आता कॅप्टन्सी टास्कमध्ये आम्ही पाणी प्यावं म्हणून विश्वास आमच्यावर ठेवणार” पॅडीने थेट जाब विचारल्याने वर्षा यांची बोलती देखील बंद झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “मिस्टर युनिव्हर्सला धाप लागली…”, संग्रामला टोला, तर अरबाजच्या खेळाचं कौतुक; उत्कर्ष शिंदेच्या पोस्टने वेधलं लक्ष

Bigg Boss Marathi

दरम्यान, पंढरीनाथच्या खेळीचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. “पॅडी भाऊ मस्तच”, “पॅडी दादा एकच पंच मारतात पण जोरात मारतात”, “पॅडी भाऊ खरंच खूप चांगलं खेळत आहेत” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi pandharinath kamble angry on varsha usgaonker due to this reason watch promo sva 00
Show comments