Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला सध्या सगळ्या प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. टेलिव्हिजन विश्वातील सर्वात वादग्रस्त शो म्हणून या कार्यक्रमाला ओळखलं जातं. 'बिग बॉस मराठी'मध्ये यंदाच्या पाचव्या पर्वात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले होते. यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील यांनी घराचा निरोप घेतला. पहिल्याच आठवड्यात घरातील सदस्यांमध्ये तुफान भांडणं होत असल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय घरात दोन गट देखील झालेले आहेत. 'बिग बॉस'मध्ये एका गटात निक्की, अरबाज, वैभव, जान्हवी हे सदस्य आहेत. तर, दुसऱ्या गटातील अभिजीत, अंकिता, योगिता, आर्या, वर्षा, धनंजय हे सगळे सदस्य मिळून या चार जणांना तगडी स्पर्धा देत आहेत. पहिल्याच आठवड्यात रितेश देशमुखने निक्की अन् टीमची शाळा घेतली होती. वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण आणि आर्याशी सतत केलेल्या भांडणामुळे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांकडून सुद्धा निक्की आणि तिच्या टीमला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. हेही वाचा : Devara Part – 1 : ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरचं रोमँटिक गाणं संगीतकाराने केलंय कॉपी? नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “काही वर्षांपूर्वी…” प्रसिद्ध निर्मात्यांची जान्हवीसह वैभव - अरबाजसाठी संतप्त पोस्ट रितेश देशमुखने शाळा घेतल्यानंतर निक्की थोडीफार जपून खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, जान्हवी अन् अरबाज अनेकदा पातळी सोडून भांडणं करत असल्याचे आरोप घरातील इतर सदस्यांकडून केले जात आहेत. यावर मराठी कलाविश्वातील कलाकारांकडून सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत. प्रसिद्ध निर्माते संदीप सिंकद यांनी देखील पोस्ट शेअर करत जान्हवीसह अरबाज - वैभवला खडेबोल सुनावले आहेत. "अरबाज पटेल, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर हे लोक 'बिग बॉस मराठी'च्या घरातले गुंड आहेत. हे स्पर्धक अतिशय वाईट पद्धतीने खेळ खेळत आहेत." अशी पोस्ट शेअर करत संदीप सिंकद यांनी आपल्या पोस्टवर संतप्त झाल्याचे इमोजी दिले आहे. हेही वाचा : Bigg Boss Marathi : “फॉरेनची पाटलीण मस्तच…”, रांगडा गडी पडलाय परदेसी गर्लच्या प्रेमात? पाहा नवीन प्रोमो… प्रसिद्ध निर्मात्यांची Bigg Boss Marathi बद्दल पोस्ट हेही वाचा : Bigg Boss Marathi : छोट्या पुढारीसमोर हात जोडून अंकिता प्रभू वालावलकर पडली पाया, नेमकं काय घडलं? पाहा… दरम्यान, उत्कर्ष शिंदे, पुष्कर जोग, मेघा धाडे, सौरभ चौघुले या मराठी विश्वातील कलाकारांसह नेटकऱ्यांनी देखील निक्की, जान्हवी, अरबाज आणि वैभवच्या घराती वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे. आता येत्या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी १५ जणांपैकी कोण नॉमिनेट होणार आणि रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर कोणाची शाळा घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.