Bigg Boss Marathi Rakhi Sawant And Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आज आला. आजच्या भागात ( २८ सप्टेंबर ) घरात ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतची एन्ट्री झाली होती. हिंदी ‘बिग बॉस’ गाजवून आलेली निक्की तांबोळी घरात ज्याप्रकारे वागत होती त्यामुळे बहुसंख्य प्रेक्षकांनी लवकरात लवकर वाइल्ड कार्ड म्हणून घरात राखीला पाठवा अशी मागणी केली होती. मात्र, राखी स्पर्धक म्हणून नव्हे तर फक्त काही वेळासाठी घरात विशेष पाहुणी म्हणून सहभागी झाली होती.

मुख्य प्रवेशद्वारातून घरात राखी सावंतने एन्ट्री घेतल्याचं पाहून निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला होता. या दोघी हिंदी ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वात सहभागी झाल्या होत्या. त्या सीझनमध्ये या दोघींची जोरदार भांडणं व्हायची. राखी निक्कीला चांगलीच पुरून उरली होती. त्यामुळे राखीने घरात एन्ट्री घेतल्यावर निक्कीच्या तोंडून “हाय रब्बा” असा शब्द निघाला. यानंतर सर्वांसमोर राखीने निक्कीची भरपूर फिरकी घेतली. तिच्या खेळातील वागणुकीवरून तिची कानउघडणी देखील केली. तर आधीच्या पर्वातील अनेक गोष्टी राखीने सर्वांसमोर सांगितल्या.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : सलग दुसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्याला ब्रेक! रितेश देशमुख गैरहजर कारण…; परत कधी दिसणार? ‘बिग बॉस’नेच सांगितलं…

Bigg Boss Marathi : राखी सावंत काय म्हणाली?

राखीने घरात पाऊल ठेवल्यावर निक्कीची फिरकी घेण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, “सस्ती राखी सावंत…हा काय प्रकार? ही त्या सीझनमध्ये होती…तिथे एकाही मुलाला सोडलं नाही. ओ वर्षा ताई ऐकलंत का? या कोपऱ्यात आय लव्ह यू… त्या कोपऱ्यात आय लव्ह यू बोलून ही शेवटपर्यंत राहिली आणि बाकी सगळे बाहेर गेले.”

राखी पुढे निक्कीला विचारते, “अरबाजचा साखरपुडा झालाय हे खरंय का?” यावर निक्की काहीच उत्तर देत नाही. हे पाहून पुढे राखी म्हणते, “ही कोपऱ्यात बसून रडत होती…त्याचा कप घेऊन बसलेली…सारखं मिस करतेय, मिस करतेय. राणी एकटी पडली माझा राजा बाहेर आहे असं सगळं सुरू होतं.”

हेही वाचा : Pravin Tarde : धर्मवीर २ बाबत सुषमा अंधारेंची खोचक पोस्ट, प्रवीण तरडेंचं रोखठोक उत्तर; “आधी सिनेमा…”

Bigg Boss Marathi Rakhi Sawant
Bigg Boss Marathi Rakhi Sawant : राखीने घेतली निक्कीची फिरकी

“प्रत्येक सीझनमध्ये तुझ्या फिलिंग्ज बाहेर येतात. तुम्ही बाहेर जाऊन हे सगळं आधीच्या सीझनचं बघा. ही मस्त परफ्युम मारते…तो मुलं पटवण्याचा परफ्युम मारते आणि जाते… मग, हिला कोणीच नॉमिनेट करत नाहीत.” असं सांगत राखीने सर्वांसमोर निक्कीची बोलती बंद केली.

राखी शेवटी म्हणाली, “हा सीझन सुपरडुपर हीट आहे. आता एक आठवडा गाजवून टाका, वाजवून टाका.” दरम्यान, आता सध्या घरात ( Bigg Boss Marathi ) आठ सदस्य आहेत यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार हे पाहणं उद्याच्या भागात महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader