Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर आज गणपती विशेष भाग पाहायला मिळणार आहे. निक्कीने घरात केलेली चुकीची वक्तव्यं, घरात ड्युटी करण्यास दिलेला नकार या सगळ्यासाठी रितेश अभिनेत्रीला खडेबोल सुनावणार आहे. याशिवाय निक्कीची कॅप्टन्सी संपूर्ण सीझनभर रितेशकडून रद्द करण्यात आली आहे. याचा अर्थ आता यापुढे घरातील कॅप्टन्सी संदर्भातील कोणत्याही कार्यात निक्की सहभागी होऊ शकणार नाही.
एकीकडे निक्कीला शिक्षा झालेली असताना, दुसरीकडे घरातून कोण बेघर होणार याचं दडपण घरातील प्रत्येक सदस्याला आलं आहे. अरबाज पटेल, घन:श्याम, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, आर्या जाधव आणि धनंजय पोवार असे एकूण ७ सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले होते. घरातून एवढे सदस्य नॉमिनेट झाल्याने प्रेक्षकांच्या भुवया देखील उंचावल्या होत्या. आता यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. सध्याचा व्होटिंग ट्रेंड पाहता घन:श्यामला सर्वात कमी मतं मिळाल्याचं बोललं जात आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नेमकं घराबाहेर कोण गेलंय? याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
हेही वाचा : Video : देशमुखांच्या घरचा बाप्पा! संपूर्ण कुटुंब एकत्र जमलं अन् मुलांनी केली आरती; जिनिलीयाने दाखवली खास झलक, पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi : जान्हवीला अश्रू अनावर
रितेश यामध्ये म्हणतो, “आता होणार आहे एलिमिनेशन…ज्यांना मोदक मिळतील ते सेफ होतील आणि ज्यांना नारळ मिळणार ते या घराचा निरोप घेणार” यानंतर रितेशने एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव घरातील अन्य स्पर्धकांना सांगितलं. हे नाव प्रोमोमध्ये उघड करण्यात आलेलं नाही. मात्र, प्रोमोमध्ये डीपी आणि विशेषत: जान्हवीला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय.
जान्हवीला रडताना पाहून या प्रोमोच्या कमेंट्स सेक्शनमध्ये अनेकांनी डबल एविक्शन होऊन अरबाज आणि घन:श्याम दोघं बाहेर होतील असा अंदाज वर्तवला आहे. तर, अनेकांनी केवळ अरबाज बाहेर होईल असंही म्हटलं आहे. “अरबाज आणि घनश्याम… नारळ”, “अरबाज आणि घनश्याम घ्या नारळ चला बाहेर”, “अरबाज घराबाहेर जाणार शब्द आहे आपला”, “जान्हवी रडतेय म्हणजे अरबाज गेला असणार” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर ( Bigg Boss Marathi ) केल्या आहेत.
हेही वाचा : Video : जंगलाचा देखावा, विविध प्राणी अन् हाताने घडवली बाप्पाची सुंदर मूर्ती; मराठी अभिनेत्रीच्या कौशल्याचं होतंय कौतुक
दरम्यान, आता प्रत्यक्षात घरातील ( Bigg Boss Marathi ) एकूण ७ नॉमिनेटेड सदस्यांपैकी कोणाचा प्रवास संपणार आणि कोण घरात राहणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.