Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर सध्या रितेश देशमुखने घरातल्या सगळ्याच स्पर्धकांना धारेवर धरल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या संपूर्ण आठवड्यात घरातल्या इतर सदस्यांबरोबर जान्हवी किल्लेकरचे टोकाचे वाद झाले. त्यामुळे यंदाच्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेशने जान्हवीची चांगलीच हजेरी घेतली आहे. रितेश देशमुखने सर्वप्रथम जान्हवीला वर्षा उसगांवकरांच्या पुरस्कारांवरून केलेल्या वक्तव्याबद्दल जाब विचारला. यानंतर जान्हवी एका भांडणात अभिजीतला "हातात बांगड्या भर" म्हणाली होती. यावरून देखील रितेशने तिला खडेबोल सुनावले आहेत. जान्हवी अन् निक्कीची 'बिग बॉस'च्या घरात पहिल्या दिवसापासून घट्ट मैत्री आहे. परंतु, या दोघींमध्ये या आठवड्याच्या सुरुवातीला काहीसे मतभेद झाले होते. यावेळी जान्हवीने सोफ्यावर बसून रडत "आपण सर्व प्लॅनिंग करतो आणि क्रेडिट निक्की घेऊन जाते" असं वक्तव्य केलं होतं. हेही वाचा : ‘सही रे सही’; प्रयोग क्रमांक ४४४४! जान्हवीने आपल्याच जवळच्या मैत्रिणीबद्दल अशी चुगली केल्याचं रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर सांगितलं. जान्हवीने केलेली ही चुगली ऐकून घरात सर्वांनाच धक्का बसला. सुरुवातीला जान्हवी तिची चूक मान्य करत नव्हती त्यामुळे रितेश रागात म्हणाला, "जान्हवी नीट ऐका…मी जे बोलतोय ते खरं बोलतोय… तुम्ही सोफ्यावर बसून लिव्हिंग एरियामध्ये बोलत होता. सगळं आपण करतोय आणि क्रेडिट निक्की घेऊन जाते." निक्कीला सुद्धा जान्हवी असं बोलेल यावर विश्वास बसत नव्हता. हेही वाचा : Bigg Boss Marathi : भाऊच्या धक्क्यावर अक्षय कुमारची एन्ट्री! ‘झापुक झुपूक…’ म्हणत सूरजसह धरला ठेका, तर वर्षा उसगांवकरांना म्हणाला… Bigg Boss Marathi : जान्हवीला येणार बिग बॉसच्या घरात चक्कर ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी ) Bigg Boss Marathi : जान्हवीला आली भोवळ रितेशने सर्वांसमोर सत्य सांगितल्यावर जान्हवी ढसाढसा रडू लागली. निक्कीला सुद्धा रितेशने केलेला खुलासा ऐकून धक्का बसला होता. बेडरुममध्ये गेल्यावर जान्हवीला भोवळ आली. भोवळ येऊन पडल्यावर तिला उचलून उपचारासाठी पाठवण्यात आल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता जान्हवीला भोवळ आल्यावर घरात कोणता नवीन ड्रामा होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. हेही वाचा : Bigg Boss Marathi : योगिता चव्हाणला अश्रू अनावर; रितेशसमोर व्यक्त केली ‘बिग बॉस’ सोडण्याची इच्छा, पण…; नेमकं काय घडलं? बिग बॉसच्या घरात जान्हवी बरी होऊन परतल्यावर निक्की तिच्याशी कशी वागेल? दोघींची मैत्री कायम राहील की नाही? आता या गोष्टी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.