Bigg Boss Marathi Riteish Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’च्या बहुचर्चित पाचव्या पर्वाने प्रेक्षकांचा ७० दिवसांनी निरोप घेतला आहे. सूरज चव्हाणने यंदाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं तर, लोकप्रिय गायक अभिजीत सावंत या सीझनचा उपविजेता ठरला. यावर्षीच्या ‘बिग बॉस’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. टीआरपीने सर्व रेकॉर्ड्स मोडत उच्चांक गाठला होता. याचं श्रेय ग्रँड फिनालेला रितेशने सर्व सदस्यांना दिलं.

रितेश देशमुखने यावर्षी पहिल्यांदाच होस्टिंगची ( Bigg Boss Marathi ) जबाबदारी सांभाळली होती. गेल्या ७० दिवसांमध्ये या शोने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. त्यामुळे ग्रँड सोहळा पार पडल्यावर संपूर्ण टीमला भरून आलं होतं. रितेशने या सोहळ्याची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
bigg boss marathi irina rudakova wishes happy bhaubeej to dhananjay powar
“Happy भाऊबीज भावा”, कोल्हापुरात धनंजय पोवारने केलेला पाहुणचार पाहून इरिना भारावली! म्हणाली, “नुसतं प्रेम…”
marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
Bigg Boss Marathi 5 fame Nikki Tamboli was called vahini by paparazzi video viral
Video: ‘वहिनी’ हाक मारताच लाजली निक्की तांबोळी, अरबाज पटेलबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
suraj chavan new reel comments
सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”
Lakhat Ek Aamcha Dada
अखेर तो क्षण आला, तुळजाला झाली प्रेमात पडल्याची जाणीव; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नवीन वळण
Neelam Kothari
“ती खूप घाबरली…”, समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा; म्हणाला, “तुम्ही विशीत असताना…”

रितेश गेली दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावर गैरहजर होता. चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेता लंडनला होता मात्र, ग्रँड फिनालेसाठी वेळात वेळ काढून रितेश फक्त एका दिवसासाठी भारतात परतला होता. ‘बिग बॉस’च्या सेटवर रितेशची ग्रँड एन्ट्री झाल्यावर सगळ्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. यावेळी त्याची पत्नी जिनिलीया देशमुख देखील सेटवर उपस्थित होती. सूरजला विजेता घोषित केल्यावर अभिनेत्याने त्याच्याबरोबर छान असा सेल्फी काढला. यानंतर बॅकस्टेजला सूरजने रितेश-जिनिलीयाची भेट घेतली.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “अंकिताशी यापुढे मैत्री होणार नाही” घराबाहेर आल्यावर अभिजीतचं मोठं वक्तव्य! म्हणाला, “निक्की माझी…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

सूरजने पाहताच क्षणी रितेशला मिठी मारली. अभिनेत्याने सुद्धा जवळ घेऊन त्याचं कौतुक केलं. यावेळी सूरज त्याला म्हणाला, “सर, मला लय बरं वाटतंय” यावर रितेश म्हणाला, “मला तर तुमचा फार अभिमान आहे. कारण हा माझा पहिला शो आहे आणि यंदा तुम्ही ही ट्रॉफी जिंकली” यानंतर सूरज असं काही बोलला ज्यामुळे जिनिलीयासह सगळेच खळखळून हसू लागले.

हेही वाचा : “भावा एकदम झापुक झुपूक…”, Bigg Boss ने घराबाहेर काढलेल्या आर्याची सूरजसाठी पहिली पोस्ट! ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

सूरज रितेशला काय म्हणाला?

सूरज म्हणाला, “अहो सर, तुम्ही आलात म्हणून मी आलो, नाही. मी खरंच बोलतोय… जेव्हा मला समजलं ना तुम्ही आहात यावर्षी म्हटलं जायचं… आता झापुक झपूक पॅटर्न दाखवू किंग गुलीगत!” याचा अर्थ रितेश यंदा होस्ट म्हणून आहे हे समजल्यावर मी शोसाठी होकार दिला अशा भावना सूरजने जिंकल्यावर व्यक्त केल्या. सूरजचं वक्तव्य ऐकून सगळेच खळखळून हसले आणि त्याचं मनापासून कौतुक केलं. हा Inside व्हिडीओ रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.