Bigg Boss Marathi 6 Promo : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आठव्या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. प्राजक्ता शुक्रे, प्रभू शेळके, रुचिता जामदार, तन्वी कोलते, सागर कारंडे, दिपाली सय्यद, संस्कृती साळुंके या सात जणांवर एलिमिनेशनची टांगती तलवार असणार आहे. आता यांच्यापैकी घरातील प्रवास कोणाचा संपणार हे वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होईल. आता सध्या ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सी कार्य सुरू आहे.
विशालने संस्कृतीची चावी चोरल्यामुळे त्याला या आठवड्यात महत्त्वाची पॉवर मिळेल. पण, घरातील सदस्य विशालला कॅप्टन होऊ देणार नाहीयेत. राखी सावंत विशालला थेट सांगते, “आम्हाला कोणालाच तू कॅप्टन म्हणून नको आहेस…कारण तू चीटर आहेस.”
आपल्याला कॅप्टन होण्यासाठी कोणीच साथ दिली नाही हे पाहून विशाल प्रचंड अस्वस्थ होतो आणि म्हणतो, “तुम्ही सगळे घाबरताय का मला? तुमची फाXXX”
विशालची ही भाषा ऐकून सागर त्याला त्याच शब्दांत उत्तर देणार आहे. सागर म्हणतो, “काय फाXXX विशाल सांग जरा? त्यांच्याकडे चावी होती…कॅप्टन व्हायची संधी त्यांच्या हातात होती. मग तुझी का फाXX सांग? चावी का चोरलीस तू?”
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “सागर दादा बरोबर बोलला”, “खूप दिवसांनी सागर बोलला बाबा…गरज होती”, “सागर मुद्द्यावर आला…पहिल्यांदा योग्य तेच बोलला”, “असाच गेम खेळ सागर”, “सागर बरोबर नडला त्या विशालला…ही काय भाषा झाली बोलायची”, “विशालचा गेम आता संपलाय कोणीच त्याला साथ देणार नाही”, “विशालला जे काही सुनावलंय मस्तच” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आठव्या आठवड्याची कॅप्टन होणार आहे राखी सावंत. या संदर्भातील पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. आता राखीला कॅप्टन होण्याची संधी कशी मिळणार? प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्यानुसार विशाल, रुचिता आणि संकेत या टास्कदरम्यान ‘उलट पुल्टा’ रूममध्ये असतात. त्यामुळे इथेच गेम फिरून राखीला कॅप्टन होण्याची संधी मिळेल असं बोललं जात आहे. आता प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी आज एपिसोडमध्ये ऑन एअर झाल्यावर स्पष्ट होतील असं सांगितलं जात आहे.
