‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून किरण माने यांना ओळखले जाते. नुकतंच त्यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात धमाकेदार एंट्री घेतली. त्यानंतर त्यांनी धमाकेदार फटकेबाजी करत सिनेसृष्टीतील कलाकारांवर टीकाही केली. बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध गोष्टींवर त्यांचे मत मांडताना दिसतात. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात हजेरी लावल्यानंतर किरण मानेंनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रसिक प्रेक्षकांना आवाहन केले आहे.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : ‘शेवंता’, किरण माने अन् ‘मिसेस मुख्यमंत्री’…, ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होणाऱ्या कलाकारांची संपूर्ण यादी 

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

…माझा इस्वास हाय तुमी माझी साथ सोडनार नाय ! मानूस हाय मी, माणसासारखा वागनार तिथं. मनापास्नं. कुठलंच ढोंग नाय करनार. खेळ हाय त्यो. स्विकारलाय तर जीव लावून खेळनार. ढिला पडनार नाय. हसनार, हसवनार, चिडनार, चिडवनार, भांडनार, वाद घालनार, मैत्री केलीच तर ‘दिल से’ करनार…ती निभावनार. एखाद्यानं पंगा घेतला तर त्याला त्याची जागा दाखवायला कमी नाय पडनार.

…गावाकडचा गडी हाय. शेतकरी कुटूंबातला. रानात फिरलेला, ढेकळं तुडवलेला. नदीत,विहिरीत पोहलेला. एका गोष्टीवर कंट्रोल ठेवायचा जिवापाड प्रयत्न करावा लागनारंय दोस्तांनो. ‘शिवी’ ! ‘शिवी’ हा आमच्या बोलीतला अविभाज्य भाग हाय. त्या शिव्यांचा अर्थ नस्तो डोक्यात. एक एक्सप्रेशन म्हनून ती बाहेर येती एवढंच. आवो आमी तर लै छोटी मान्सं, आमच्या पहाडासारख्या तुकोबारायाच्या अभंगातबी तुमाला शिव्या सापडत्याल. निव्वळ मनातली भडास व्यक्त करन्याचं साधन म्हनून शिवी येती तोंडात. पन त्याचा तिथं ‘इश्यू’ हुईल.. माझ्याविरूद्ध शस्त्र म्हनून वापर हुईल, हे म्हायतीय मला. कारन मी बी लै शिवराळ हाय. भांडताना मला त्या सवयीवर लगाम घालायला लागनार… ते करीन.

…माझ्या भावांनो आनि बहिनींनो, मी तुमचं मनोरंजन करन्यात कनभरबी कमी पडनार नाय. माझ्याकडनं चुका झाल्या तर त्या पोटात घ्याल तुमी हे बी म्हायतीय मला.

मला एक महत्त्वाचं सांगावंसं वाटतंय. मी तुकोबारायांवर कायम लिहीत असतो. तुकोबा माझ्या श्वासात हाय. मी गौतम बुद्धांवर व्याख्यान देतो. छ. शिवराय, छ. शंभूराजे यांच्यावर व्याख्यानं देतो. महाराष्ट्रातल्या गांवोगांवी जाऊन महात्मा फुले, लोकराजा शाहू महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करतो. या सगळ्या महामानवांचे विचार माझ्या रक्तात हायेत. पन एक लक्षात ठेवा, सामान्य मानूस ज्या चुका करतो, त्या माझ्याकडनं बी होत्यात. मी आदर्श असल्याचा मुखवटा घालून नाय खेळनार. अभिनेता, सेलिब्रिटी म्हनून ‘बिग बाॅस’सारख्या शो मध्ये जाताना मी केवळ एक त्या शो चा खेळाडू म्हनून खेळीन. “बाहेर व्याख्यानांत महामानवांवर बोलतो आनि शो मध्ये बघा कसा भांडतोय.” असा गोंधळ करून घेऊ नका. मी बिग बाॅसच्या घरात केवळ या शो च्या ‘फाॅरमॅट’चं पालन करून खेळनारा एक खेळाडू असेन. खेळाडू, एक अभिनेता म्हनूनच माझ्याकडं बघा आनि शो चा आनंद घ्या, असे किरण मानेंनी म्हटले आहे.

आणखी वाचा- Bigg Boss Marathi 4 Grand Premiere Live : ‘शेवंता’ फेम अपूर्वा नेमळेकर ‘बिग बॉस’ मराठीमध्ये होणार सहभागी, वाचा संपूर्ण यादी

दरम्यान बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला २ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रँड प्रिमियरमध्ये बिग बॉसच्या १६ सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली. यात किरण माने, अपूर्वा नेमळेकर, अमृता घोंगडे, प्रसाद जवादे, तेजस्विनी लोणारी यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.