छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त तरीही लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस’ मराठीला ओळखले जाते. यंदाचं पर्व हे ‘ऑल इज वेल’ या थीमवर आधारित आहे. ‘बिग बॉस’ मराठीमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नाव समोर येण्यास आली आहे. ‘बिग बॉस’ मराठीचे चौथे पर्व सुरु झाल्यापासून सदस्यांमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. अपूर्वा आणि प्रसादमध्ये कडाक्याचे भांडण होताना पाहायला मिळत आहे. पण या घरात एक आवाज कायमच ऐकायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात दिल्या जाणाऱ्या आदेशांना कोणाचा आवाज दिला जातो, अशा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. नुकतंच यामागचे नाव समोर आलं आहे.

‘बिग बॉस’ आदेश देत आहे की…, हा आवाज ऐकला की डोळ्यासमोर ‘बिग बॉस’चे घर उभं राहतं. हा आवाज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. गेल्या तीन पर्वापासून प्रेक्षक हा आवाज ऐकत आहेत. पण या आवाजामागचा चेहरा कोणाला माहित नव्हता. ‘बिग बॉस मराठी’च्या आवाजामागचा खरा चेहरा व्हाईस आर्टिस्ट रत्नाकर तारदळकर यांचा आहे. पहिल्या दोन्ही पर्वांना त्यांचा आवाज लाभला आहे.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : ‘शेवंता’, किरण माने अन् ‘मिसेस मुख्यमंत्री’…, ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होणाऱ्या कलाकारांची संपूर्ण यादी 

रत्नाकर तारदळकर यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ‘बिग बॉस’चे पडद्यामागचे काम, त्याची जबाबदार आणि त्याचे ऑडिशन याबद्दल भाष्य केले आहे. त्यावर ते म्हणाले, “बिग बॉसच्या घरातील मुख्य माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हा आदेश हुकुमी वाटत असेल तरी त्या आदर असतो. त्यामुळे तो आवाज त्या दृष्टीने असावा याकडे लक्ष असते. तसेच बिग बॉस करताना एक वेगळी जबाबदारीही असते.”

“विशेष म्हणजे मला बिग बॉस २४ तास पाहावं लागतं. सकाळी १० वाजता स्पर्धकांना टास्क देण्यापासून याची सुरुवात होते. तो टास्क पूर्ण होईपर्यंत मी कुठे जाऊ शकत नाही. तसेच टास्क संपण्याची वेळ ठरलेली नसते. सकाळी १० वाजता सुरु झालेला टास्क कधी कधी दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजतादेखील संपू शकतो. टास्कदरम्यान अनेकदा मध्यरात्री स्पर्धकांची भांडणेही होतात. अनेकदा मध्यरात्रीदेखील स्पर्धकांची भांडणं झाल्यावर पुन्हा एकदा सेटवर यावं लागतं. त्यामुळे मला मनाने बिग बॉसच्या घरातच राहावं लागत होतं. त्यावेळी कोणाचा फोन घेऊ शकत नाही.” असे रत्नाकर तारदळकर म्हणाले.

आणखी वाचा- Bigg Boss Marathi 4 Grand Premiere : ‘शेवंता’ फेम अपूर्वा नेमळेकर ‘बिग बॉस’ मराठीमध्ये होणार सहभागी, वाचा संपूर्ण यादी

“बिग बॉससाठी ऑडिशन घेण्यात आली होती. त्यांना आश्वासक आवाज हवा होता. बिग बॉस आवाज माझा आहे हे मी सर्वांपासून लपवणं फार कठीण होतं. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी मी काहीही म्हणालो तरी लोक म्हणायचे हा आवाज आम्ही कुठे तरी ऐकला आहे. बिग बॉस हा कार्यक्रम वेगळा आहे. या कार्यक्रमात मानसिकता जपली जाते. आदेश देण्यासोबत स्पर्धकांसोबत संवाददेखील साधावा लागतो.” असेही त्यांनी म्हटले.