scorecardresearch

बिग बॉसच्या घरात होणार अपूर्वा नेमळेकरची एंट्री?, प्रोमो प्रदर्शित

बिग बॉस मराठी ४च्या ग्रँड प्रीमियरची झलक आता समोर येऊ लागली आहे.

बिग बॉसच्या घरात होणार अपूर्वा नेमळेकरची एंट्री?, प्रोमो प्रदर्शित

बिग बॉस’चे तिन्ही पर्व प्रचंड गाजल्यानंतर आता उद्यापासून या शोचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठी ४च्या ग्रँड प्रीमियरची झलक आता समोर येऊ लागली आहे. रोज एका स्पर्धकाचा प्रोमो वाहिनीकडून शेअर केला जात आहे. यामध्ये स्पर्धकाचा चेहरा दिसत नसला तरी प्रेक्षक मात्र तो चेहरा ओळखण्यात दंग झाले आहेत. यावेळी या पार्वत कोण दिसणार याचा अंदाज लावण्यात प्रेक्षक रमले आहेत.

आणखी वाचा : “आज मी तुमच्यामुळे…”, रश्मिका मंदानाने माधुरी दीक्षितबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो आउट झाला आहे. यात एक अभिनेत्री नृत्य करताना दिसतेय. ‘बिग बॉस च्या घरात थिरकली.. लोखो दिलाची धडकन’ असा आवाज या प्रोमोत ऐकू येत आहे. शिवाय ही स्पर्धक गंगुबाई चित्रपटातील ‘ढोलीडा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. संपूर्ण प्रोमोमध्ये तिचा चेहरा दिसत नसल्याने ती अभिनेत्री कोण असू शकते हे प्रेक्षक कमेंट्स करून सांगत आहेत. तर ती अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आहे असे अनेकांनी म्हटले आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत ‘शेवंता’ ही भूमिका सकारात तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. पण काही मतभेदांमुळे तिने ती मालिका सोडली. त्यानंतर ती फारशी कुठे दिसली नाही. त्यामुळे प्रोमोमध्ये दिसणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच आहे असं म्हटलं जात आहे. पण खरंच अपूर्वा बिग बॉसच्या घरात दिसणार की नाही हे निश्चित करण्यासाठी प्रेक्षकांना आणखीन थोडी वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा : महेश मांजरेकर म्हणतात, “संजय राऊत बिग बॉसच्या घरात आले असते तर…”

दरम्यान बिग बॉस मध्ये विविध क्षेत्रातील १६ कलाकार सहभागी होणार आहे. ‘ऑल इज वेल’ ही या नव्या पर्वाची थीम आहे. तर आधीच्या पर्वांप्रमाणेच महेश मांजरेकर या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या