scorecardresearch

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना प्रसाद ओकने म्हटलं चिखल, अमृता देशमुखला पाठिंबा देत म्हणाला…

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाबाबत प्रसाक ओकने केलेलं वक्तव्य चर्चेत. अमृता देशमुखसाठी केली कमेंट.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना प्रसाद ओकने म्हटलं चिखल, अमृता देशमुखला पाठिंबा देत म्हणाला…
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाबाबत प्रसाक ओकने केलेलं वक्तव्य चर्चेत. अमृता देशमुखसाठी केली कमेंट.

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या रंजक वळणावर आहे. गेल्या आठवड्यामध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून दोन सदस्य घराबाहेर पडले. विकास सावंत व अमृता देशमुख यांचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधील प्रवास संपला. दरम्यान अमृताला मात्र तिचं घराबाहेर पडणं अयोग्य वाटलं. तिने घरातून बाहेर आल्यानंतर एक पोस्टही शेअर केली होती. आता अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने अमृताबाबत आपलं मत मांडलं आहे.

आणखी वाचा – Kuttey Trailer : शिवीगाळ, इंटिमेट सीन अन् तब्बूची एण्ट्री, अर्जून कपूरच्या ‘कुत्ते’चा ट्रेलर प्रदर्शित, संतोष जुवेकरचीही दिसली झलक

अमृताने तिला पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांचे घरातून बाहेर पडताच आभार मानले. शिवाय घरातून बाहेर पडल्याचं दुःख अजूनही पचवू शकले नसल्याचं तिने पोस्टद्वारे सांगितलं. तर अनेक कलाकार मंडळीही हा अमृताने घराबाहेर येणं चुकीचं होतं असं म्हणत आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर आल्यानंतर अमृता ‘राजसी मराठी’साठी लाइव्ह करत होती. यावेळी प्रसाद ओकने लाइव्दरम्यानच एक कमेंट केली. प्रसाद कमेंट करत म्हणाला, “तू चिखलात कमळ होतीस.” अमृताने त्याच्या कमेंटचा स्क्रिनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला.

आणखी वाचा – “एक चट्टान, सौ शैतान…” कपाळी भस्म अन् भेदक नजर, अजय देवगणचा ‘भोला’मधील अंगावर काटा आणणार लूक, पाहा व्हिडीओ

प्रसादने केलेली कमेंट पाहून अमृताने त्याचे आभार मानले.”प्रसाद ओक खूप खूप प्रेम” असं अमृताने म्हटलं. अमृताला कलाक्षेत्रामधील अनेक मंडळी पाठिंबा देत आहेत. तसेच तिने ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये असायला हवं असं प्रेक्षकही म्हणत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 15:12 IST

संबंधित बातम्या