Video : "कोणालाचा झोपू देणार नाही" राखी सावंतचा 'बिग बॉस मराठी'च्या घरात ड्रामा सुरू, मध्यरात्रीच मागितली कॉफी अन्... | bigg boss marathi season 4 rakhi sawant new drama fight with vishal nikam video goes viral on social media | Loksatta

Video : “कोणालाचा झोपू देणार नाही” राखी सावंतचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ड्रामा सुरू, मध्यरात्रीच मागितली कॉफी अन्…

राखी सावंतने ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये ड्रामा सुरू केला आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

bigg boss marathi season 4 bigg boss marathi
राखी सावंतने 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये ड्रामा सुरू केला आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे. एकूण चार स्पर्धकांची घरा एन्ट्री झाली आहे. राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जग्गनाथ या सदस्यांनी घरात दमदार एन्ट्री केली. राखीला घरात पाहिल्यानंतर इतर सदस्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. राखीने घरात प्रवेश करताच वादाला सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 16 : “आता राडा होणार” पुण्याचा गोल्डमॅन सनी वाघचौरेला पाहून घरातील सदस्यही हैराण, अंगावरील सोनं पाहिल्यानंतर म्हणाले…

राखीने आता घरामध्ये नवा ड्रामा सुरू केला आहे. आधी राखीने तेजस्विनी लोणारीशी वाद घालायला सुरुवात केली. रहिवासी संघ बोर्डवर पहिल्या नंबरला कोणाच्या नावाची पाटी लागणार यावरून तेजस्विनी व राखीमध्ये वाद रंगला.

आता राखीने चक्क मध्यरात्री ‘बिग बॉस’कडे कॉफी मागितली आहे. कलर्स मराठी वाहिनीने एक नवा प्रोमो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. यामध्ये राखी इतर सदस्य झोपले असताना मोठ्याने बोलताना दिसत आहे. हे ऐकून विशाल निकम म्हणतो, “तुमच्या बोलण्यामुळे सगळ्यांना त्रास होत आहे. शांत बसा.” यावर राखी म्हणते, “तू झोप मला सांगू नकोस.”

आणखी वाचा – Video : “तुझा एक हात तुटला आहे आता दुसराही…” पहिल्याच दिवशी राखी सावंत व तेजस्विनीमध्ये जोरदार भांडण

यावर विशाल म्हणतो, “आरेरावी नाही चालणार इथे.” माझी मर्जी असं म्हणत राखी मी कोणालाच झोपू देणार नाही असं म्हणते. विशाल तिचं वागणं पाहून अजून मोठ्याने ओरड असं म्हणतो. राखीचं हे वागणं पाहून प्रेक्षकही संतापले आहेत. ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये तुझी मर्जी चालणार नाही, विकास तूच राखीला घराबाहेर काढ असं प्रेक्षक म्हणत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 13:40 IST
Next Story
केळीचे खांब, फुलांनी सजला राणादा-पाठकबाईंच्या लग्नाचा मंडप, मेहंदी कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू