scorecardresearch

Video : तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडताच चक्क जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागले किरण माने, प्रेक्षकही भडकले

तेजस्विनी लोणारी ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर पडताच प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे.

Video : तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडताच चक्क जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागले किरण माने, प्रेक्षकही भडकले
तेजस्विनी लोणारी 'बिग बॉस मराठी'च्या घराबाहेर पडताच प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत आहेत. सध्या घरातील सदस्यांमधील नात्याची गणितही बदलताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राखी सावंतसह तीन नव्या सदस्यांची घरामध्ये एन्ट्री झाली आहे. गेल्याच आठवड्यामध्ये समृद्धी जाधव घराबाहेर पडली. आता प्रेक्षकांना एक दुसरा धक्का ‘बिग बॉस’ने दिला आहे.

आणखी वाचा – “तुला बाहेर काढलं…” तेजस्विनी लोणारीच्या एक्झिटवर बिग बॉसच्या स्पर्धकाची प्रतिक्रिया

स्पर्धक तेजस्विनी लोणारीने ‘बिग बॉस’च्या घरामधून एक्झिट घेतली आहे. तेजस्विनीला टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान घरात राहायचं की नाही हा निर्णय तेजस्विनीला घेण्यास बिग बॉसने सांगितलं होतं. पण घरात राहूनच मी खेळ खेळेन असं तेजस्विनीने ‘बिग बॉस’ला म्हटलं होतं. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं ‘बिग बॉस’कडून सांगण्यात आलं.

डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर ‘बिग बॉस’ने तिला घरातून बाहेर पडण्याचा निर्णय दिला. तेजस्विनी घरातून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षक मात्र संताप व्यक्त करत आहेत. कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक प्रोमो शेअर केला आहे. यावर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – Video : घट्ट मिठी मारली, किस केलं अन्…; शालीन भानोत व टीना दत्ताचा ‘बिग बॉस’च्या घरात खुलेआम रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

तेजस्विनीला घराबाहेर का काढलं?, तेजस्विनीला घराबाहेर काढायला नको होतं, जी हा बिग बॉस जिंकणार होती तिलाच घराबाहेर काढलं, तेजस्विनी बेस्ट आहे असं प्रेक्षक म्हणत आहे. शिवाय तेजस्विनी घराबाहेर पडत असताना किरण माने, अमृता धोंगडेही ढसाढसा रडताना दिसत आहेत. पण तेजस्विनी बरी झाल्यानंतर ती पुन्हा घरात एन्ट्री करणार का? हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 20:07 IST

संबंधित बातम्या