‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची आता वेगवेगळी बाजू पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस ४’ स्पर्धकांमधील भांडणं व राडे सध्या चर्चेत आहेत. अशातच आता आणखीन एक स्पर्धक चर्चेचा विषय ठरत आहे. तो स्पर्धक म्हणजे योगेश जाधव. योगेश घरातील सर्वात शांत आणि शिस्तप्रिय स्पर्धक आहे असं वाटत असताना त्याचा एक वेगळाच व्हिडीओ समोर आला आहे.

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये योगेशचा राग अनावर झाला असल्याचं दिसत आहे. आजच्या नव्या भागामध्ये योगेशला एवढा राग का आला? हे समजेलच. पण शोचा हा नवा प्रोमो पाहता घरातील सदस्यांमध्ये जोरदार राडे होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

crow playing tic tac toe viral video
मालक अन् कावळ्यात रंगला फुल्ली-गोळ्याचा खेळ! पाहा कोण जिंकलं…. Video होतोय व्हायरल
IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच

पाहा व्हिडीओ

या प्रोमोच्या सुरुवातीला योगेश थोंड डोकं आहे का तुला? असं मेघा घाडगेला बोलत आहे. यावर मेघा म्हणते, “तुझा मेंदू दोन्ही गुडघ्यांमध्ये आहे ते सांभाळ आधी.” या वादामध्ये अपूर्वा नेमळेकर म्हणते, “यांचं जेवढं वय नाही ना तेवढं तिचं करिअर आहे.” वाद सुरु असताना मेघा चल निघ असं योगेशला म्हणते.

आणखी वाचा – Big Boss Marathi 4 : …अन् चक्क विकास सावंतच्या अंगावर बसली अपूर्वा नेमळेकर, व्हिडीओ तुफान व्हायरल

हा वाद सुरु असताना योगेशला राग अनावर होतो. तो घरातील सदस्यांच्या अंगावर धावून जातो. इतकंच नव्हे तर अपूर्वासह काही स्पर्धक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. “मी तुमच्या बापाचं खातो का?” असंही योगेश म्हणतो. रागाच्या भरामध्ये खुर्ची उचलतो आणि जोरात जमिनीवर आपटतो. पण या सगळ्या वादामध्ये नेमकी चुकी कोणाची? हे नव्या भागामध्ये पाहायला मिळेल.