Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुलेची जबरदस्त एन्ट्री झाली आहे. त्याच्या एन्ट्रीनंतर एक टास्क पार पडला. या टास्कनंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. नेमकं टास्कमध्ये काय घडलं? आणि संग्रामच्या खेळावर मराठी अभिनेता नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस’ने संग्राम चौगुलेला न आवडलेल्या सदस्यांना विहिरीत ढकलण्याचा टास्क दिला होता. ज्या सदस्यांना संग्राम विहिरीत ढकलणार ते सदस्य आठवडाभर बेड वापरून शकणार नाहीत. शिवाय ते सदस्य जेवणासाठी केवळ उकडलेले पदार्थ खाऊ शकतात. तसंच ज्या सदस्यांना संग्राम विहिरीत ढकलणार नाही; ते सर्व सोयी-सुविधा वापरू शकतात. जोडीमधील एका सदस्याला ढकलणं बंधनकारक होतं.

हेही वाचा – Video: गणपतीच्या नैवेद्यावरून चारुलताबरोबर अधिपतीचा वाद, म्हणाला, “आमच्या आईसाहेबांनी घालून दिलेली परंपरा…”

पहिल्यांदाच पंढरीनाथ कांबळे व अरबाज पटेल ही जोडी होती. त्यामधील अरबाजला संग्रामने विहिरीत ढकललं. त्यानंतर वैभव चव्हाण आणि सूरज चव्हाण ही जोडी होती. यातील संग्रामने सूरजला वाचवून वैभवला विहिरीत ढकललं. मग जान्हवी किल्लेकर-आर्या जाधव आणि अंकिता वालावलकर-वर्षा उसगांवकर या दोन जोड्यांना पाठवण्यात आलं. तेव्हा संग्रामने या दोन्ही जोड्यांमधील आर्या आणि अंकिता पाण्यात ढकललं.

शेवटी निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि धनंजय पोवार हे त्रिकुट होतं. या त्रिकुटामधील दोन सदस्यांना पाण्यात ढकलणं बंधनकारक होतं. त्यामुळे संग्रामने निक्की आणि धनंजयला विहिरीत ढकललं. यावेळी निक्की व संग्राममध्ये तू तू में में झाली. निक्कीने वैद्यकीय कारण देत पाण्यात जाण्यास मनाई केली. पण इतर काही सदस्यांनी निक्कीला पाण्यात ढकललंच पाहिजे, असा सूर लावला. त्यानंतर ‘बिग बॉस’नेच यात मध्यस्थी करून निक्की पाण्यात जाऊ शकते, असं जाहीर केलं. यावेळी निक्की स्वतःहून विहिरीत उतरली. पण नियमानुसार संग्रामने ढकलायचं होतं, त्यामुळे इतर सदस्यांनी याला विरोध केला. त्याच वेळी बाजूला असलेल्या निक्कीला संग्रामने अचानक पाण्यात ढकललं आणि तिथूनच वादाची ठणगी पेटली. संग्रामने विहिरी ढकलल्यामुळे निक्की संतापली. ती संग्रामने घेतलेल्या निर्णयाला विरोध करू लागली. यावेळी अरबाज निक्कीच्या बाजूने उभा होता. दोघं संग्राम विरोधात बोलू लागले.

संग्रामने खेळलेल्या याच टास्कवर ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात झळकलेला अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट शेअर केली आहे. सुरुवातीला त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलं की, वाह वाह बिग बॉस, लव्ह यू. त्यानंतर अभिजीतने आणखी एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलं, “बिग बॉस, ये दिल मांगे मोर…खोकल्यावर उपाय केलात, पण नाक अजून फुरफुरतय, आता सर्दी घालवायला ब्रिंग बॅक राखी.

Abhijeet Kelkar Story

हेही वाचा – Video: तुळजा झाली जगतापांची सून, गृहप्रवेश करत असताना डॅडींनी घेतला टोकाचा निर्णय, पाहा ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा प्रोमो

दरम्यान, अभिजीत केळकरच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बऱ्याच नेटकऱ्यांनी अभिजीतच्या मताला सहमती दर्शवली आहे. सध्या अभिजीतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 abhijeet kelkar share post on sangram chougule entry pps
Show comments