Bigg Boss Marathi Season 5 : रविवारी ( १५ सप्टेंबर ) झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने घरातील सदस्यांना एक मोठं सरप्राइज दिलं. ते म्हणजे रितेश देशमुख स्वतः ‘बिग बॉस’च्या घरात गेला आणि त्याने सदस्यांना सरप्राइज दिलं. रितेशने प्रत्येक सदस्याला त्यांच्या घरातील सदस्यांचे व्हिडीओ दाखवले. यावेळी काही सदस्यांच्या मुलांनी व्हिडीओच्या मार्फत त्यांच्याशी संवाद साधला. तर काही सदस्यांच्या आई-वडिलांनी आणि मित्रांनी संवाद साधला. यादरम्यान लाडक्या लेकींचा व्हिडीओ पाहून अभिजीत सावंत ओक्साबोक्शी रडू लागला. अभिजीतच्या लेकी काय म्हणाल्या? जाणून घ्या…

अभिजीत सावंत मुलींची नावं आहेत आहना आणि स्मिरा. दोघींनी व्हिडीओच्या सुरुवातीला सगळ्यांना नमस्कार केला. म्हणाल्या, “हाय अडा, कसा आहेस तू? नमस्कार रितेश भाऊ आणि बाकीच्या सगळ्या सदस्यांना. अडा, तुला एका महिन्यांनी आम्हाला बघू कसं वाटतंय? तुझी खूप आठवण येतेय…पण तू काळजी नको करू…तू गेमवर फोकस कर, तू जेवढं चांगलं खेळतो ना, तसंच खेळत राहा…”

हेही वाचा – ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’मध्ये झळकणार रिंकू राजगुरू, चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला, सिद्धार्थ जाधवने फोटो केले शेअर

पुढे अभिजीतची मोठी लेक आहना म्हणाली, “मला माहितीये तुला तुझे क्रॉक्स खूप प्रिय आहेत. पण त्यांना थोड्यावेळ साइटला ठेव आणि स्पोर्ट्स शूज घाल. टास्कसाठी तरी. तू खरंच खूप चांगलं खेळतोस.” त्यानंतर दोघी एकत्र म्हणाल्या की, जेव्हा तू इंडियन आयडल बनला होता आणि ट्रॉफी घेतली होती. तेव्हा आम्ही नव्हतो. पण यावेळेस आम्हाला तुला ट्रॉफी घेताना बघायचं आहे. ऑल दे बेस्ट.

मुलींचा हा व्हिडीओ पाहून अभिजीतला अश्रू अनावर झाले. तो ओक्साबोक्शी रडू लागला. तेव्हा रितेशने त्याला धीर दिला आणि विचारलं, “अभिजीत, सरप्राइज कसं वाटलं?” अभिजीत म्हणाला, “दोन दिवसांनंतर पण मुलांना बघणं खूप भारी असतं. आज दीड महिना होईल. त्यांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की तुमचा बाबा लढतोय. बाबावरती विश्वास ठेवा. लढत राहिन. जोपर्यंत इथे आहे. थँक्यू.”

हेही वाचा – Video: “अपनी औलाद को सुधारो…”, निक्की तांबोळीच्या आईला मराठी अभिनेत्रीचा सल्ला, म्हणाली, “वर्षाताईंना अपशब्द वापरले…”

पाहा व्हिडीओ

दरम्यान, रितेश देशमुखने घरातील सदस्यांना सरप्राइज दिल्यानंतर एक धक्कापण दिला. आर्या जाधवला घराबाहेर काढलं असलं तरी रविवारी आणखी एक सदस्य बेघर झाला. तो म्हणजे वैभव चव्हाण. रितेश देशमुख स्वतः वैभवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर घेऊन गेला.