Bigg Boss Marathi Season 5 : नुकताच बीबी करन्सीचा टास्क झाला. गॅस कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी घरातील सदस्यांना जास्तीत जास्त बीबी करन्सी मिळवायची होती. यासाठी ‘बिग बॉस’ने पाच जोड्या केल्या होत्या. पंढरीनाथ-संग्राम, धनंजय-वर्षा, अरबाज-जान्हवी, निक्की-अभिजीत आणि सूरज-अंकिता या पाच जोड्यांमधील फक्त तीनच जोड्यांनी बीबी करन्सी जिंकली. अरबाज-जान्हवी आणि सूरज-अंकिता यांना अपयश मिळालं. घरातील सदस्यांनी एकूण ८० हजार बीबी करन्सी मिळवली. त्यामुळे आता सर्व सदस्यांना संपूर्ण आठवडाभर आठ तासांचं गॅस वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. म्हणून सध्या सदस्यांची जेवण करताना धावपळ होतं आहे. अशातच ‘बी टीम’चा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ‘बी टीम’ निक्कीच्या चालण्यावरून चर्चा करताना दिसत आहे.

‘सिने मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘बी टीम’मधील चर्चेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला अंकिता निक्कीची हुबेहूब नक्कल करताना दिसत आहे. निक्की डान्स करताना कशी एन्ट्री करते हे दाखवत अंकिता म्हणते, “ती केस उडवत एन्ट्री करते. त्या दिवशी तुम्ही ( पंढरीनाथ कांबळे ) तिच्यासारखं केलेत ना?” पुढे पंढरीनाथ कांबळे मी तिची चाल बघितली आहे म्हणतं नक्कल करताना पाहायला मिळत आहे. ( Bigg Boss Marathi )

Bigg Boss Marathi Season 5 Ankita walawalkar Target To Abhijeet Sawant
Video: “याला स्वतःच्या हिंमतीवर पुढे जायचं नाहीये”, अंकिताने अभिजीतला लगावला टोला, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Pandharinath Kamble And Nikki Tamboli
“घरातून प्रेतयात्रा चालल्यासारखं…”, अरबाज जाताना निक्कीच्या वागण्यावर पंढरीनाथ कांबळेचे परखड वक्तव्य
anil thatte entry in bigg boss marathi season 5 after rakhi sawant and Abhijeet bichukale
Video: राखी सावंत, अभिजीत बिचुकलेनंतर ‘बिग बॉस’मध्ये अनिल थत्तेंची एन्ट्री! निक्कीचं कौतुक, तर वर्षा उसगांवकरांना म्हणाले…
Nikki Tamboli- Arbaz Patel Relationship is Over Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi: “सगळं संपलं,” अरबाजबद्दल आईने सांगितलं ते ऐकून भडकली निक्की, त्याचे कपडे फेकले अन्… पाहा VIDEO
Aishwarya Rai Bachchan was spotted seemingly wearing her wedding ring at Paris fashion week During Divorce Rumours
Video: घटस्फोटाच्या चर्चांना ऐश्वर्या राय-बच्चनने ‘असं’ दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi 5 Press Conference promo
Video: अरबाज पटेलबद्दल ‘तो’ प्रश्न अन् निक्कीचा चेहराच पडला, बिग बॉसच्या घरात झाली पत्रकार परिषद
Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant made a mess in BB Currency task
Video : बीबी करन्सीच्या टास्कमध्ये अभिजीत सावंतने केली गडबड, घरातील सदस्यांसह ‘बिग बॉस’नेही घेतली त्याची फिरकी

हेही वाचा – Video: दाक्षिणात्य सुपरस्टार हात मिळवण्यासाठी पुढे आला पण आराध्याने…; ऐश्वर्या राय-बच्चनच्या लेकीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

हे बघून अंकिता म्हणते, “विचार करा, या स्पीडला हा ( अभिजीत सावंत ) मॅच करत होता. पुढे ती वेगाने चालत होती आणि मागे हां. मला याच्या पायाचं टेन्शन होतं.” पुढे अभिजीत म्हणाला, “ती डायगनल चालते.” ‘बी टीम’च्या सदस्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ( Bigg Boss Marathi )

हेही वाचा – “बिग बॉसच्या घरात निक्कीच्या बडबडीचा खूप त्रास होतो”, एलिमिनेट झालेल्या वैभव चव्हाणचं विधान, म्हणाला, “तिचा मूळ स्वभाव…”

कॅप्टन्सीच्या शर्यतीतून ‘हे’ दोन सदस्य बाद

दरम्यान, सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात कॅप्टन्सीचा टास्क सुरू आहे. ‘ए टीम’मध्ये अरबाज, धनंजय, अंकिता, सूरज असून ‘बी टीम’मध्ये अभिजीत, अंकिता, संग्राम, जान्हवी आणि पंढरीनाथ आहे. या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी सदस्यांना दुसऱ्या सदस्याच्या घरट्यात अंड ठेऊन त्या सदस्याला कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद करायचं आहे. पहिल्या फेरीत ‘ए टीम’कडून अरबाज आणि निक्की खेळली होती. तर ‘बी टीम’कडून संग्राम आणि जान्हवी खेळली होती. या फेरीत अरबाज-निक्कीने दोन अंडी मिळवली आणि निक्कीने ही अंडी अंकिता व पंढरीनाथ यांच्या घरट्यामध्ये ठेवली. त्यामुळे आता अंकिता व पंढरीनाथ कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.