Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सातव्या आठवड्याच्या शेवटी घरात एक राडा झाला. ‘जादूई हिरा’ उचलण्याच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या व निक्की यांच्यात वाद झाले. दोघींमध्ये धक्काबुकी झाली. पण शेवटी आर्याने रागाच्या भरात निक्कीवर हात उचलत तिला कानशिलात लगावली. यामुळे आर्याला तात्पुर्त जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली आणि कठोर शिक्षा ‘भाऊच्या धक्क्या’वर सुनावण्यात येणार असं जाहीर केलं.

त्यानंतर शनिवारी झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर आर्याला ‘बिग बॉस’ने कठोर शिक्षा सुनावली. घरातील मोठ्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे ‘बिग बॉस’ने आर्याला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला. ‘बिग बॉस’च्या या निर्णयामुळे आर्याच्या चाहत्यांसह अनेक जण नाराज झाले आहेत. आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णया विरोधात निषेध करत आहेत. इतकंच नव्हे तर घराबाहेर केल्यामुळे ‘बिग बॉस मराठी’ पाहणं बंद केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याने देखील तीव्र संताप जाहीर केला आहे.

aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
bigg boss marathi aarya slaps nikki surekha kudachi reaction
“अरबाज बोंबलत सुटला थप्पड मारली…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी सुरेखा कुडचींचा सवाल, म्हणाल्या…
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
bigg boss marathi aarya eliminated from the house
“निक्की ६ आठवडे त्रास देतेय, तिची भाषा…”, आर्याला Eliminate केल्यावर पुष्कर जोग संतापला! म्हणाला, “ती चुकली, पण…”
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli And Arbaz Patel in Danger zone, janhvi, suraj varsha usgaonkar safe
Video: घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्की तांबोळीचा फुटला टाहो, ‘हे’ सदस्य झाले सेफ, पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi Aarya Slaps Nikki marathi actress reaction
“जाणीवपूर्वक हिंसा निंदनीयच…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, “मनाने खंबीर…”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिका बंद होणार की वेळ बदलणार? जुई गडकरी चाहत्यांच्या प्रश्नांचं उत्तर देत म्हणाली…

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेने आर्याला घराबाहेर काढल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट करत निषेध नोंदवला आहे. फेसबुकवर पोस्ट लिहित अंकुर म्हणाला, “बिग बॉस मराठीला ‘निक्की बिग बॉस मराठी’ असं नाव घोषित करा. हम करें सो कायदा…हा काय प्रकार आहे?” या पोस्टमध्ये त्याने बॉयकॉटचं हॅशटॅग वापरलं आहे.

अंकुर वाढवेच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, बरं झालं कोणीतरी यावर सच्च्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “स्क्रिप्टेड शो आहे. निक्की आणि अरबाजने विकत घेतला आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “चला…इतकं तरी नक्की आहे की, तू प्रत्येक भाग बारकाईने बघतोयस.” नेटकऱ्याच्या या प्रतिक्रियेवर अंकुर म्हणाला, “अरे मी पहिल्या पर्वापासून बघतो. पण हे पर्व अत्यंत थुकरट आहे.”

हेही वाचा – Video: “तुम्ही हा आठवडा गाजवला…”, रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचं केलं कौतुक, म्हणाला, “अंगाला तेल लावून…”

दरम्यान, सातव्या आठवड्यात निक्की, वैभव, अंकिता, अभिजीत, वर्षा आणि आर्या नॉमिनेट झाले आहेत. आर्या नुकतीच घराबाहेर गेली असली तरी उर्वरित पाच सदस्यांमधील एक सदस्य बेघर होणार आहे. त्यामुळे आता निक्की, वैभव, अंकिता, अभिजीत आणि वर्षा उसगांवकरांपैकी कोण एलिमिनेट होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.