Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या बीबी करन्सीसाठी टास्क सुरू आहे. गॅस कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी घरातील सदस्यांना जास्तीत जास्त बीबी करन्सी मिळवायची आहे. आतापर्यंत बीबी करन्सीच्या टास्कमध्ये तीन फेऱ्या झाल्या आहेत. ‘बिग बॉस’ने केलेल्या जोड्यांनुसार तीन फेऱ्या खेळल्या आहेत. यामध्ये पंढरीनाथ-संग्राम यांनी २० हजार, धनंजय-वर्षा यांनी ३० हजार तर अरबाज-जान्हवीने शून्य करन्सी मिळवली आहे. ‘काकाकुवा’ या पक्षामुळे अरबाज-जान्हवीला बीबी करन्सीच्या टास्कमध्ये अपयश मिळालं आहे. आजच्या ( १८ सप्टेंबर ) भागात आता उर्वरित जोड्या खेळताना पाहायला मिळणार आहेत. याचे प्रोमो सध्या व्हायरल झाले आहेत. अशातच अरबाज पटेल ‘बिग बॉस’च्या एका घोषणेमुळे नाराज झालेला दिसला. याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
बीबी करन्सीच्या टास्कदरम्यानचा व्हिडीओ ‘सिने मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ‘बिग बॉस’ टास्कमधील पुढील जोडी घोषित करताना दिसत आहेत. हीच जोडी ऐकून अरबाज पटेलचा चेहरा पडलेला पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – Bigg Boss Marathi: सूरज चव्हाणला पाण गेंडा ओळखताना आले नाकीनऊ; सर्व सदस्यांना झालं हसू अनावर, पाहा व्हिडीओ
या व्हिडीओत, ‘बिग बॉस’ म्हणतात की, पुढील जोडी आहे या घरातील गाजलेली जोडी…तेव्हा निक्की म्हणते, “मी आणि सूरज..” यावर अंकिता म्हणते, “तू आणि अभिजीत असणार…तुमचीच जोडी गाजलेली आहे.” लगेच ‘बिग बॉस’ म्हणतात, “निक्की आणि अभिजीत.” हे ऐकून पंढरीनाथ कांबळे म्हणतो, “शाब्बास…गाजलेली आहे.”
पुढे अंकिता म्हणते, “काय नाही. गॅससाठी भांडताना गॅस लावून दिलाय मस्त..आता माचिस टाकली आहे.” त्यानंतर ‘बिग बॉस’ म्हणतात, “…आणि संचालक आहे.” तेव्हा सर्व सदस्य अरबाज पटेल असेल, असं म्हणून लागतात. यावेळी निक्की म्हणते, “बिग बॉस इतका वेळ का बरं?” तितक्यात लगेच ‘बिग बॉस’ म्हणतात की, मला भूक लागलीये संघटनेचे अध्यक्ष अंकिता…
हेही वाचा – “तुझ्यासारखं व्यक्त होता येत नसलं तरी…”, प्रिया बापटच्या वाढदिवशी पती उमेशची खास पोस्ट; बायकोबद्दल म्हणाला…
दरम्यान, आता निक्की आणि अभिजीत अचूक पक्षी, प्राणी ओळखून किती बीबी करन्सी जिंकतायत? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. तसंच घरातील सर्व सदस्य एकूण किती बीबी करन्सी जिंकणार आणि किती वेळासाठी गॅसचं कनेक्शन मिळवणार? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd