Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आज रितेश देशमुखच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर गणरायाचं आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने दमदार मनोरंजन होणार आहे. यावेळी लोकप्रिय गायक-गायिकांचे परफॉर्मन्स होणार आहेत. तसंच विशेष पाहुणे म्हणून प्रसिद्ध संगीतकार जोडी सलीम-सुलेमान उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे आजचा ‘भाऊचा धक्का’ खास असणार आहे.

गणपती स्पेशल ‘भाऊच्या धक्क्या’वर नेहमीप्रमाणे टास्क खेळले जाणार आहे. यामधील एका टास्कसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातील मास्टर माइंड म्हणून ओळखला जाणार उत्कर्ष शिंदे घरात जाणार आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
big boss marathi these contestants nominated in this week
Bigg Boss Marathi : घरातील ६ सदस्य झाले नॉमिनेट! पण, नेटकऱ्यांकडून अंकिताचं कौतुक, काय आहे कारण?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli And Arbaz Patel in Danger zone, janhvi, suraj varsha usgaonkar safe
Video: घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्की तांबोळीचा फुटला टाहो, ‘हे’ सदस्य झाले सेफ, पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi season 5 Abhijeet Kelkar share post on Sangram Chougule entry
“खोकल्यावर उपाय केलात पण…”, संग्राम चौगुलेच्या जबरदस्त खेळावर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “ब्रिंग बॅक राखी”
bigg boss marathi riteish deshmukh announced elimination
“ज्यांना नारळ मिळणार ते घराबाहेर…”, रितेशच्या घोषणेनंतर जान्हवीला अश्रू अनावर; नेटकरी म्हणाले, “ही रडतेय म्हणजे अरबाज…”

हेही वाचा – दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट, बॉलीवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांच्या शुभेच्छांचा होतोय वर्षाव

Bigg Boss Marathi ( Photo Credit - Colors Marathi )
Bigg Boss Marathi ( Photo Credit – Colors Marathi )

‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये उत्कर्ष शिंदे रितेश देशमुखने दिलेले खास गिफ्ट्स स्पर्धकांना देताना दिसत आहे. प्रोमोमध्ये, उत्कर्ष म्हणतोय की, भाऊंनी तुमच्यासाठी काही स्पेशल गिफ्ट्स पाठवले आहेत. त्यानंतर तो घरातील प्रत्येक स्पर्धकाला रितेशने पाठवलेले गिफ्ट्स देताना दिसत आहे. यावेळी गिफ्ट्स पाहून स्पर्धकांचे अश्रू अनावर झालेले दिसत आहेत. अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, वैभव चव्हाण हे स्पर्धक भावुक झालेले पाहायला मिळत आहेत.

पुढे, अंकिता सगळ्यांना घरच्या गणपतीचा फोटो दाखवताना दिसत आहे. तर वैभव फोटोमधल्या आई-वडिलांची ओळख करून देत आहे. तसंच जान्हवी, धनंजय देखील फोटो दाखवत भावुक झालेले दिसत आहेत.

हेही वाचा – Video: “मधेमधे तिच्या तोंडून…”, पंढरीनाथ कांबळेने निक्कीला भरवला कडू लाडू, कारण देत म्हणाला…

पाहा नवा प्रोमो

हेही वाचा – Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरमुळे चाहत्याचं झालं नुकसान, म्हणाला, “तुमच्यामुळे बायकोने…”

‘बिग बॉस मराठी’च्या या प्रोमोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “उत्कर्ष दादा खूप छान वाटलं…आपण आलात”, “उत्कर्ष दादाने सगळ्या महाराष्ट्राला वेड लावलं आता ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरातल्या लोकांची फिरकी घेणार”, “मस्त” अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. आता हा नवा स्पर्धक कोण असणार आहे? हे पाहणं महत्त्वाचं आहे.