Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तिसऱ्या आठवड्यात दोन नव्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. या पाहुण्यांची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी ‘बिग बॉस’ने घरातल्या सदस्यांवर सोपवली आहे. यासाठी स्पर्धकांची दोन टीममध्ये विभागणी करण्यात आली आहे. घरात बाहुल्यांरुपी बाळांचं आगमन झाल्यामुळे घरात सगळे गुण्यागोविंदाने नांदतील अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, सगळंच उलटं घडताना दिसत आहे.

‘बिग बॉस’ने ( Bigg Boss Marathi ) दोन्ही टीमला बाहुल्यांरुपी बाळ सुपूर्द करताना काही अटी व नियम घालून दिले होते. बाळाला नेहमी हातात घ्यायचं, रडल्याचा आवाज आल्यावर स्विमिंग पूलमध्ये एका सदस्याने जायचं…संपूर्ण भिजून बाहेर आल्यावर लंगोट बदलायचं, बाळाला भूक लागल्यावर टीममधील एका सदस्याने बाळासाठी पाठवण्यात आलेलं जेवण एकट्याने संपवायचं तसेच, ज्या सदस्याच्या हातात बाळ असेल त्यांनी मराठी सोडून अन्य भाषेचा वापर करायचा नाही.

हेही वाचा : सलमान खानच्या हिंदी ‘बिग बॉस’मध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री झळकणार? निर्मात्यांकडून विचारणा झाल्याचं आलं समोर

Bigg Boss च्या घरात दोन्ही गटांमध्ये जोरदार भांडणं

घरात दोन्ही गट टास्क सुरू झाल्यावर एकमेकांच्या चुका काढताना दिसले. कोणी इंग्रजी शब्द वापरल्याने विरुद्ध गटाची बीबी करन्सी कट केली. तर, निक्कीने बाळाचे लंगोट देखील लपवून ठेवले आहेत. यामुळे घरात वादाचे प्रसंग उद्भवून दोन्ही गटात धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं.

‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये सगळे सदस्य एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय रितेश देशमुखने समज देऊनही निक्की अन् जान्हवीचा गोंधळ या टास्कमध्ये देखील चालू आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी या प्रोमोवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. मेघा धाडेने यावर “बिग बॉस तुम्ही या दोन पिसाळलेल्या निक्की, जान्हवीला कुठून शोधून आणलं? यांना उपचाराची गरज आहे” अशी कमेंट करत आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : अंकिता, धनंजय यांना अजूनही अभिजीत सावंतवर आहे डाउट, गॉसिप करताना म्हणाले, “आपलंच नाणं खोटं…”

Bigg Boss Marathi ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

हेही वाचा : Bigg Boss शी बोलताना योगिता चव्हाण ढसाढसा रडली! जोरदार भांडणांमुळे बिथरली, अभिनेत्रीने केली घरी जाण्याची मागणी

दरम्यान, भावनांच्या या खेळात सगळे झाले भावनाशून्य झाल्याने आता ‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) या सगळ्या सदस्यांना कोणती शिक्षा देणार याचा उलगडा आजच्या भागात होणार आहे.