Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व स्पर्धकांनी पहिल्या दिवसापासून चांगलंच गाजवलं आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे स्पर्धक एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. शनिवारी रितेश देशमुखचा 'भाऊचा धक्का' पार पडला. या भाऊच्या धक्क्यावर रितेशने आठवडाभर स्पर्धकांनी घातलेल्या गोंधळावरून चांगलीच शाळा घेतली. तसंच सतत वर्षा उसगांवकर यांच्याशी भांडणाऱ्या आणि अपमान करणाऱ्या निक्की तांबोळीचा रितेशने माज उतरवला. तिला माफी मागायला सांगितली. त्यामुळे रितेश देशमुखच्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. याशिवाय जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे, वैभव चव्हाण, अंकिता प्रभू वालावलकर या सगळ्यांना रितेशने चांगलंच सुनावलं. आजही रितेशचा 'भाऊचा धक्का' पाहायला मिळणार आहे. यावेळी बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. अशातच कोल्हापूरचा लाडका डीपी अर्थात धनंजय पोवार व इरिनाच्या परफॉर्मन्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'भाऊच्या धक्क्या'वर धनंजय पोवारने इरिनाबरोबर 'भूतानी पछाडलं' गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ 'कलर्स मराठी'च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत कोल्हापुरी ढसक्यात धनंजय आणि इरिनाचा डान्स पाहायला मिळत आहे. दोघांचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. इरिनाबरोबर डान्स केल्यामुळे धनंजयच्या चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. "घरला गेल्याव वहिनी ठेवत नसत्या तुला", "कल्याणी वहिनी दादाकडे लक्ष द्या", "डीपीदा, वहिनी आता घरातून दांडक फेकून मारत्या ब तुला…आल्याव वहिनी भूत काढत्या बघ कशी…" अशा अनेक प्रतिक्रिया धनंजयच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. हेही वाचा - Video: ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा चांगला मित्र आहे ‘हा’ अभिनेता, शूटिंगचा किस्सा सांगत म्हणाला… एका चाहत्याने लिहिलं आहे, "कल्याणी वहिनी भेटली बघा कविता वहिनी. कल्याणी वहिनीची सवत." तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे, "डीपीदा 'बिग बॉस' ( Bigg Boss Marathi ) जिंकून परत तुम्हाला घरी जायचं आहे. आता वहिनी तुम्हाला काही सोडत नाहीत." तसंच तिसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे, "डीपी दादा आता मजा करू घ्या. जिंकून बाहेर आल्यावर कल्याणी वहिनी तुमचा चांगलाच समाचार घेणार आहेत." Bigg Boss Marathi हेही वाचा – Video: “तेरी मेरी यारिया…”, ‘बिग बॉस मराठी’ विजेती मेघा धाडेची फ्रेंडशिप डेनिमित्ताने ‘यांच्या’साठी खास पोस्ट, सई किंवा पुष्कर नव्हे तर… 'हे' स्पर्धक घराबाहेर जाण्यापासून वाचले दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वातील पहिल्याच आठवड्यात सहा स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यामध्ये वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता प्रभू वालावकर, पुरुषोत्तमदादा पाटील आणि सूरज चव्हाण या सहा जणांचं नाव सामिल आहे. पण काल दोन स्पर्धक वर्षा उसगांवकर आणि सुरज चव्हाण घराबाहेर होण्यापासून वाचले. आता योगिता चव्हाण, अंकिता प्रभू वालावकर, पुरुषोत्तमदादा पाटील आणि धनंजय पोवार यातून कोण पहिल्याच आठवड्यात बेघर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.