Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सदस्य सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांचे प्रत्येक फोटो, व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच जान्हवी किल्लेकरबाबत एक अफवा पसरली आहे. ज्याविषयी आता तिने भाष्य करत या अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली आहे. नेमकी अफवा काय आहे? आणि जान्हवी काय म्हणाली? जाणून घ्या…

काही दिवसांपूर्वी ‘सिने चित्र’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना जान्हवी किल्लेकरला विचारलं होतं की, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तू ड्रेसिंग ठरवून गेली होती का? की या दिवशी हे घालायचं? दुसऱ्या दिवशी हे घालायचं? हे ठरवलं होतं का? यावर जान्हवी म्हणाली, “खरं सांगू मी १०० कपडे आणि ४० नाइट ड्रेस खरेदी गेले होते. कोणाशीही कोलॅब्रेशन केलं नव्हतं. आता माझा बेडरूम कपड्यांनी भरला आहे. काही दिवसांनी मी कपड्यांचा लिलाव लावणार आहे,” असं ती मजेत म्हणाली होती. पण, यावरून जान्हवी किल्लेकर ‘बिग बॉस’च्या घरात घातलेल्या कपड्यांचा लिलावर लावणार असल्याच्या अफवा उडाल्या आहेत. यासंदर्भात नुकताच जान्हवीने व्हिडीओ शेअर केला आहे.

bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel video call
निक्की तांबोळीने केला सूरज चव्हाणला Video कॉल! सोबतीला होता अरबाज; म्हणाली, “भावा लवकरच…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
ankita walawalkar aka kokan hearted girl replied to netizen
“गावी कोणीही या मुलीचं Welcome केलं नाही” नकारात्मक कमेंट करणाऱ्या युजरला अंकिताने सुनावलं; म्हणाली, “मी मुद्दाम…’
Ankita Walawalkar and Dhananjay Powar
होणाऱ्या नवऱ्यासह धनंजय पोवारच्या घरी पोहोचली अंकिता! लाडक्या डीपी दादांना केली भाऊबीज; फोटो आले समोर

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप अडकला लग्नबंधनात, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

“प्लीज अशा कोणत्याही चुकीच्या अफवा पसरवू नका”, असं कॅप्शन लिहित जान्हवीने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी म्हणाली, “हॅलो, व्हिडीओ बनवण्यामागचं कारण असं आहे की, मी आता एक नुकतीच अफवा वाचली. तसंच बरेच लोक फोन करूनही सांगतायत, मेसेजही येतायत. त्यामुळे मी आता स्वतःहून पाहिलं. उगाच अशी बातमी पसरली आहे की, जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरात घातलेल्या कपड्यांचा लिलाव करणार आहे. १०० कपडे आणि ४० नाइड ड्रेसचा ती लीलाव करणार आहे, असं म्हटलं जातंय. तर या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आहे? ठीक आहे. मी १०० कपडे आणि ४० नाइट ड्रेस घेतले. ते मी वापरेन. मी त्याचा लीलाव का करेन. प्लीज माझी विनंती आहे अशा काहीही अफवा पसरवू नका. मला माझे कुठलेही कपडे विकायचे नाहीयेत. तसंच ते विकण्यासारखे नाहीयेत. ते माझे कपडे आहेत. ते मी कपडे का विकू? ते काही महागडे आणि खूप ग्रेट असे कपडे नाहीयेत. त्यामुळे प्लीज उगाच काहीही अफवा पसरवू नका, ही माझी विनंती आहे.”

हेही वाचा – कौस्तुकास्पद! सामाजिक भान ठेवून पृथ्वीक प्रतापने साधेपणाने केलं लग्न, म्हणाला, “दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी…”

हेही वाचा – Video: “जग जिंकायचं आहे का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा”, संकर्षण कऱ्हाडेची कविता ऐकून कलाकार झाले भावुक, पाहा व्हिडीओ

दरम्यान, नुकतीच जान्हवी किल्लेकर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणला भेटण्यासाठी त्याच्या गावी गेली होती. या खास भेटीचे फोटो सूरजने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. “लाडकी माझी ताई”, असं कॅप्शन लिहित सूरजने जान्हवीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

Story img Loader