Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून आता दोन आठवडे उलटले आहेत. पण, चर्चा अजूनही जोरदार आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकलेल्या स्पर्धकांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. विविध चित्रपटाच्या प्रिमियर सोहळ्यांना देखील ‘बिग बॉस मराठी’मधील स्पर्धक पाहायला मिळत आहे. अशातच या पर्वात तिसऱ्याच आठवड्यातून बेघर झालेला निखिल दामलेचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर झाले होते. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात एकही स्पर्धक घराबाहेर गेला नाही. पण, तिसऱ्या आठवड्यात एक नव्हे तर दोन स्पर्धक बेघर झाले होते. निखिल दामलेसह योगिता चव्हाण एलिमिनेट झाली होती. घराबाहेर जाताना निखिलने मॅच्युअल फंड कॉइनचा वारसदार डीपी दादा म्हणजे धनंजय पोवारला केलं होतं. एकंदरीत ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निखिलचा खेळ जास्त पाहायला मिळाला नव्हता. त्यामुळे रितेश देशमुखने त्याला खूप झापलं होतं. घरात जुळे भाऊ आहेत. एक निखिल आणि दुसरा दामले, असं म्हणत रितेशने त्याची कानउघडणी केली होती. पण तरीही निखिलचा खेळ पाहायला मिळाला नाही. म्हणून निखिलचा जबरदस्त डान्स व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

हेही वाचा – Video: प्राजक्ता माळीने हास्यजत्रेच्या सेटवर स्नेहल तरडे आणि हृषिकेश जोशी यांच्याबरोबर खेळला ‘हा’ खेळ, कोण जिंकलं पाहा…

निखिलने व्हायरल होणार डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो रणबीर कपूरच्या ‘प्रेम की नैया’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. निखिलचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणने केला पहिला Reel व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “भाऊ इज बॅक”

“वाव दामले खतरनाक”, “इकडे भारी धमाल करतोय आणि ‘बिग बॉस’मध्ये काय झालं होतं तुला निखिल?”, “निखिल तू ‘बिग बॉस’मध्ये हा डान्स करायला पाहिजे होता”, “तुला ‘बिग बॉस’मध्ये काय झालं होतं?”, “निखिल आणि दामले दोघांवरूनही नजर हटेना”, “क्या बात है”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

Comments

हेही वाचा – रुपाली भोसले आणि कुशल बद्रिकेची अचानक झाली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “या मुलात जरा सुद्धा…”

दरम्यान, निखिल दामलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘अलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘यशोदा’, ‘रमा राघव’ या मालिकांमध्ये तो विविधांगी भूमिकेत झळकला. ‘रमा राघव’ या मालिकेनंतर निखिल ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पाहायला मिळाला.