Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा पहिला कॅप्टन कोण होणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. आजच्या भागात 'बिग बॉस'च्या घरात 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' हा टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये जो कोणी बाजी मारेल तो यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होईल. याशिवाय त्या स्पर्धकाला पाचव्या पर्वाचा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळणार आहे. कॅप्टनसीच्या टास्क दरम्यान घरात नेहमीच जोरदार भांडणं होतात. यापूर्वीच्या सीझनमध्ये सुद्धा आपण हे पाहिलंय. आता यंदाच्या पर्वात स्पर्धकांमध्ये पहिल्या दिवसापासून दोन गट पडले आहेत. एका बाजूला निक्की, अरबाज, वैभव, जान्हवी आहेत. तर, दुसरीकडे अभिजीत, अंकिता, आर्या, सूरज, योगिता, वर्षा, पंढरीनाथ या ग्रुपला तगडी स्पर्धा देत आहेत. त्यामुळे आपल्यातील कोणीतरी कॅप्टन व्हावं अशी दोन्ही ग्रुपच्या सदस्यांची इच्छा आहे. यासाठी 'बिग बॉस'च्या घरात खास 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' हा टास्क खेळला जाणार आहे. हेही वाचा : Quiz : ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचे चाहते असाल तर हे क्विझ खास तुमच्यासाठीच…; द्या ‘या’ १० प्रश्नांची अचूक उत्तरं 'बिग बॉस'च्या घरात 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' या टास्क दरम्यान अभिजीत अन् अरबाजमध्ये जोरदार भांडण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर अरबाज घरातल्या सगळ्या सदस्यांवर दमदाटी करणार आहे. "मी तुम्ही सगळे बघाल…मी आता कोणालाच आत ( ट्रेनमध्ये ) बसू देणार नाही" अशी धमकी अरबाजने सगळ्यांना दिली…एकंदर घरातील सदस्यांवर तो ओरडून बोलत असल्याचं पाहायला मिळालं. तर, दुसऱ्या बाजूला अंकिता टास्कदरम्यान "'बिग बॉस' प्लीज मला हर्ट होतंय" असं म्हणत असल्याचं या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. Bigg Boss Marathi ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी ) हेही वाचा : Aditi Sarangdhar : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत अदिती सारंगधरची जबरदस्त एन्ट्री, झळकणार ‘या’ भूमिकेत 'बिग बॉस'च्या ( Bigg Boss Marathi ) घराची पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर होणार अशा चर्चा सध्या चालू आहेत. दरम्यान, 'बिग बॉस'च्या घरातील हा नवा राडा पाहून नेटकऱ्यांनी या प्रोमोवर संताप व्यक्त केला आहे. "हा अरबाज किती दादागिरी करतोय", "हाकलून द्या रे त्या अरबाजला किती माज आहे", "निक्कीचे चमचे आहेत", "अभिजीत - अंकिता तुम्ही खरंच चांगलं खेळताय", "अरबाज - जान्हवी तुम्ही काहीही करा कॅप्टन नाही होणार आहात…" अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.