Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरात दोन गट तयार झाले आहेत. सुरुवातीच्या दिवसात घरात निक्की अन् वर्षा उसगांवकरांचे वाद पाहायला मिळाले होते. यावेळी निक्कीने अनेकदा भांडण करताना चुकीच्या शब्दांचा वापर केला होता. यामुळे रितेश देशमुखने पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर निक्कीची शाळा घेतली होती. त्यामुळे सध्या चालू असलेल्या दुसऱ्या आठवड्यात निक्की अत्यंत सावधपणे खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दुसऱ्या आठवड्यात निक्की शांत असली, तरीही तिची ‘बिग बॉस’च्या घरातली सर्वात जवळची मैत्रीण असलेल्या जान्हवीचे सर्वांशी वाद झाल्याचं पाहायला मिळालं. सूरज चव्हाण, आर्या, अभिजीत आणि आता नुकताच जान्हवीने वर्षा उसगांवकर यांच्याशी वाद घातला आहे.

हेही वाचा : “तुम्ही मृत्यू विकताय”, गुटख्याच्या जाहिराती करणाऱ्या अभिनेत्यांना जॉन अब्राहमने सुनावलं; म्हणाला, “जे लोक फिटनेसबद्दल…”

Bigg Boss Marathi च्या घरात नेमकं काय घडलं?

जान्हवी आर्याला “निर्लज्ज…” म्हणत गार्डन परिसरातून जात असते. वर्षा उसगांवकर पाठमोऱ्या बसलेल्या असल्याने त्यांना वाटतं नेहमीप्रमाणे जान्हवीने त्यांच्याशी भांडण करायला सुरुवात केली. यानंतर जान्हवी त्यांचा गैरसमज दूर न करता वर्षा यांच्याशी भांडू लागते. ती म्हणते, “ताई माझ्या नादी लागू नका… माझं तोंड खोलू नका. मी तुम्हाला आधीच सांगतेय… पहिल्या दिवसापासून मी तुमच्याशी आदराने बोलतेय.” यावर वर्षा म्हणतात, “तू जे हसलीस… ते आदराने हसलीस का? उपहासाने…” यानंतर जान्हवी पुन्हा म्हणते, “तुमच्यासारखी मी खोटारडी नाहीये. मी चांगल्या हेतूने हसले, तुम्ही वेगळा अर्थ घेताय.”

वर्षा जान्हवीला म्हणतात, “फाल्तू गोष्टींच्या नादी मी लागत नाही.” यानंतर मात्र जान्हवी वर्षा उसगांवकरांशी कसलाच विचार न करता मोठमोठ्याने भांडू लागली असं आजच्या भागात पाहायला मिळालं. यावेळी अंकिताने सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. जान्हवी म्हणाली, “इथे पोरं बसलीत म्हणून तुम्ही इथे येता” यावर वर्षा तिला सांगतात, “अगं पोरं काय म्हणतेस…मी माझ्या नवऱ्याबरोबर आनंदात आहे. हे किती गलिच्छ बोलणं आहे. ‘बिग बॉस’ तुमच्यापेक्षा मोठा आवाज या कळसूत्री बाहुलीचा आहे.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video: “तोंड शिवलं होतं का?” धनंजय आणि घनःश्याममध्ये पडली वादाची ठिणगी, नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरी दणका…”

जान्हवी पुढे म्हणते, “तुम्ही घाणेरडा अर्थ काढताय. ही घाणेरडी अ‍ॅक्टिंग माझ्यासमोर करू नका…हे घाणेरडं तोंड माझ्यासमोर दाखवूच नका ताई… ही फाल्तूची ओव्हरअ‍ॅक्टिंग नका करू… त्यांना आता पश्चाताप होत असेल यांना आपण पुरस्कार का दिले? कारण, बाहेर अनेक चांगले-चांगले अभिनेते आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत…पण, तुम्हाला दिलाय.”

जान्हवीने पुरस्कारांचा विषय काढल्यावर अंकिता या भांडणात मध्यस्थी करत म्हणते, “आपण त्यांच्या अभिनयावर का जातोय? तुम्ही दोघी इतर काही बोला पण, हे नको बोलूस.” जान्हवी तरीही शांत बसत नाही… भांडण करताना पुढे म्हणते, “यांना बाहेर काढतील ना… मग दोन शब्द बोलले पाहिजे म्हणून हे चालूये.” वर्षा उसगांवकर फुटेजसाठी भांडण करत असल्याचा आरोप जान्हवीने त्यांच्यावर केला.

Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

हेही वाचा : दोन मध्यांतर असलेला पहिला भारतीय सिनेमा! ६० वर्षांपूर्वी जगभरात कमावलेले ८ कोटी, सहा वर्षांनी दुसरा चित्रपट आला पण…

Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरवर नेटकरी संतापले

जान्हवीच्या या वागण्यावर सध्या नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. “जान्हवीला लाज वाटली पाहिजे…एका नामांकित अभिनेत्रीला तुम्ही असं बोलता, आजकाल १-२ मालिका करून आलेल्या पोरी त्यांच्या पुरस्कारांवर बोलतात”, “जान्हवी आधी घराबाहेर जायला हवी…एकवेळ निक्की परवडली”, “जान्हवीला आधी घराबाहेर काढा” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी ‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पोस्टवर केल्या आहेत. तर, अनेकांनी रितेश देशमुखने जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर अत्यंत कडक शब्दांत समज द्यावी अशी मागणी देखील केली आहे.